मुंबई :मुंबईस्थित महाराष्ट्र सरकारच्या सचिवालयात म्हणजेच 'मंत्रालया'त दूषित पाणीपुरवठ्यामुळे कर्मचारी आजारी पडल्याचे समोर आले आहे. दूषित पाण्याच्या तक्रारी आल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे. या दूषित पाण्याच्या प्रकरणानंतर मंत्रालयातील पाण्याच्या टाकींची सफाई दर पंधरा दिवसातून एकदा केली जाईल. तसेच या कामाचा अहवाल कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्हॉट्सअॅप वर पाठवला जाणार आहे.




२०१९ मध्ये घडला होता असाच प्रकारमंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारी आल्यानंतर प्रशासनाने पाणी टाकी साफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून पाण्याची गुणवत्ता तपासली जाणार आहे. सोबतच मिळालेले पाण्याचे अहवाल हे कर्मचार्‍यांना व्हॉट्सअॅपवर पाठवल्याने कर्मचाऱ्यांना पाण्याविषयी कोणतीच शंका मनात राहणार नाही. याआधी मंत्रालयात २०१९ मध्ये हा दूषित पाण्याचा प्रकार घडला होता. ज्यामुळे मंत्रालयातील कर्मचारी पाण्यामुळे आजारी होते. त्यानंतर यावर्षी हा दूषित पाण्याचा प्रकार पुन्हा घडल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.




अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोटदूखी ताप यांसारखे आाजारयावर्षी जुलै महिन्यात मंत्रालयात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. कर्मचाऱ्यांनी सलग तीन दिवस दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याचा आरोप केला होता. यामुळे उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि ताप यांसारख्या आजारांमुळे अनेक अधिकारी आणि कर्मचारी त्रासले होते. परिणामी मंत्रालयातील रूग्णालयांत रुग्णांची संख्या वाढली होती. या परिस्थितीला एक गंभीर स्वरूप आले होते. पाण्याची तपासणी केल्यानंतर मंत्रालयातील पाण्याच्या टाकीत कोणती त्रुटी आढळून आली नाही. तरीसुद्धा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा मुद्दा लक्षात घेऊन या पाणी प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली. त्यानुसार पाण्याच्या टाकींची सफाई आणि पाणी तपासणी नियमितपणे लागू करण्यात आली होती.




मुख्यमंत्री कार्यालय लवकरच एअर इडिंया इमारतीत स्थलांतरितसार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सचिन कांबळे यांनी सांगितले की, पाण्याच्या टाक्यांची दर १५ दिवसांनी स्वच्छता केली जात आहे. तसेच पाण्याच्या नमुन्यांचीही नियमित तपासणी केली जाते. या व्यवस्थेमुळे दूषित पाण्याची समस्या दूर होण्याची अपेक्षा आहे. सध्या दूषित पाण्याबाबत कोणत्याही तक्रारी प्राप्त होत नसल्याचेही समोर येत आहे. नियमित सफाई आणि पाण्याची तपासणी यांमुळे मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवणार नाही. अशी आशा आहे असे त्यांनी म्हंटले. मु्ंबईतील सर्वात चांगल्या ठिकाणच्या परिसरात आहे. या इमारतीत अनेक मंत्र्यांची कार्यालये आहेत. तसेच, मुख्यमंत्री कार्यालय लवकरच एअर इडिंया इमारतीत स्थलांतरित होणार असून, त्या दृष्टीने कामे सुरू आहेत.







एफडीएची कारवाईमंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आरोग्याला नेहमी महत्त्वाचा मुद्दा या दृष्टिकोनातून बघितलं जातं. अन्न व औषध प्रशासनाने मंत्रालयातील कँटीगवर धाड टाकत प्रशासन विभागाच्या पथकाने तेथील स्थितीचा अहवाल तयार केला होता.




Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.