दिवाळी म्हटली की घराची साफसफाई, सजावट आणि खरेदीची लगबग सुरू होते. सणाच्या स्वागतासाठी घराचा कोपरा न् कोपरा स्वच्छ केला जातो. मात्र, साफसफाई करताना काही छोट्या चुका झाल्यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाया जाऊ शकतात. त्यामुळे दिवाळीपूर्वी घर स्वच्छ करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.


एकाच दिवशी सफाई नको


घरातील प्रत्येक खोली एकाच दिवशी स्वच्छ करायला घेतल्यास थकवा येतो. त्यामुळे स्वच्छतेचे नियोजन करावे. एका दिवसात एक किंवा दोन भाग स्वच्छ करण्याचे ठरवा. यामुळे ताण कमी होईल.


वस्तूंचा पसारा आधी आवरा


घर स्वच्छ करण्यापूर्वी अनावश्यक वस्तू बाजूला काढा. कपाटातील जुने कागद, वापरात नसलेल्या वस्तू आणि रिकामे डबे यांची विल्हेवाट लावा. यामुळे घरातील जागा मोकळी होईल आणि साफसफाई करणे सोपे जाईल.


चुकीचा क्रम


अनेकजण आधी फरशी पुसतात आणि नंतर पंखे, खिडक्या किंवा कपाटे स्वच्छ करतात. त्यामुळे पुन्हा फरशीवर धूळ पडते. म्हणून सर्वप्रथम पंखे, खिडक्या, जाळी आणि फर्निचर स्वच्छ करा. त्यानंतर फरशी पुसा.


वस्तूसाठी वेगळे कापड


स्वयंपाकघर, बाथरूम आणि इतर खोल्यांसाठी एकच कापड वापरणे टाळा. त्यामुळे एका ठिकाणची घाण दुसरीकडे पसरू शकते. प्रत्येक भागासाठी स्वतंत्र कापड वापरावे.


सुरक्षिततेकडे दुर्लक्ष नको


स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या केमिकल्सवरील सूचना वाचाव्यात. ब्लीच आणि ॲसिडयुक्त किंवा अमोनिया असलेली उत्पादने एकत्र मिसळू नयेत. खिडक्या उघड्या ठेवा आणि उंच ठिकाणी साफसफाई करताना योग्य शिडीचा वापर करा.


नियोजन करा


साफसफाईसाठी लागणारे कापड, झाडू, ब्रश आणि इतर साहित्य आधीच जवळ ठेवा. कुटुंबातील सदस्यांमध्ये कामांची विभागणी करा. यामुळे कमी वेळेत घर स्वच्छ होईल आणि दिवाळीच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळेल.


हेही वाचा – छोटंसं बाथरूमही दिसेल नीटनेटके; वस्तू ठेवण्यासाठी स्मार्ट आयडिया



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.