Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लीप ऐकवली होती, त्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावरून आता शिवसेना आणि भाजप पक्षातील नेत्यांमध्ये खडाजंगी सुरू झाली आहे, अशातच शिवसेना नेते आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगेंच्या त्या ऑडिओ क्लिपबाबत बोलताना बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले त्या क्लिपमध्ये बदनामी कोणाची झाली तर भाजपची झाली आहे. खालच्या दर्जाचे राजकारण भाजप करत आहे. ५०० कोटीचा विषय त्या क्लिपमध्ये होता, त्यातील महिला मोठेपणाचा आव आणण्याचा प्रयत्न करत आहे, असे काही होत असेल तर बंधने आणली पाहिजे. मोठेपणाचा आव आणण्याचा प्रयत्न या क्लिपमधून दिसत आहे.(Bachchu Kadu)


मोठ्या कुठल्या नेत्यांनी दिली का? याचा तपास झाला पाहिजे....


यातून काय झाले? एकनाथ शिंदे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला आहे, यात भाजप ही बदनाम झाले आहे. भाजप कसे निवडणुकीचे फंडे वापरते ते यातून पुढे आले. याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे, या सगळ्या गोष्टीमागचा हेतू आहे हे पुढे आले आहे.आता का आली, मोठ्या कुठल्या नेत्यांनी दिली का? याचा तपास झाला पाहिजे. फार चुकीचे प्लॅनिंग करत असतील तर चुकीचे आहे, त्याचा निषेध करतो, महायुती नेत्यांनी एकत्रित बसून दूध का दूध, पाणी का पाणी समोर आणले पाहिजे, शिंदे आणि भाजप दोन्ही बदनाम होत आहेत, झारीतील शुक्राचार्य  शोधला पाहिजे असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.(Bachchu Kadu)


अंतर्गत राजकारण भाजप करत आहे, यामध्ये भाजपचे मोठे नेते यामध्ये सामील आहेत का?


एका कार्यालयातून एका कारकुनाने ती क्लिप एका मोठ्या माणसाला दिली आहे. अंतर्गत राजकारण भाजप करत आहे, यामध्ये भाजपचे मोठे नेते यामध्ये सामील आहेत का? मला तरी वाटतं ते नसले पाहिजेत, पण अशा प्रकारचं राजकारण न होणं गरजेच आहे, मोठ्या नेत्यांनी अशा गोष्टी करणाऱ्या लोकांना सांगितलं पाहिजे, त्या क्लिपमधील महिला मोठेपणाचा आवआणण्याचा प्रयत्न करण्यात आला, दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडते की काय अशी अवस्था सध्या आहे. याची चौकशी झाली पाहिजे, दोन्ही पक्षांना बदनाम केलं जातं आहे, अशा गोष्टी रोखल्या पाहिजेत, त्यावर नियंत्रण मिळवलं पाहिजे, असंही कडू म्हणालेत.


एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न


‘पाचशे कोटीचा विषय छोटा नाही. ज्या काळातला व्हिडिओ आहे,  त्याचं चित्र स्पष्ट होत नाही. हा मोठेपणा आणून काही गोष्टी रंगवल्या जातात. काही जण आम्हाला सर्व माहीत असल्याचे दावा केला जात आहे.  ऑडिओ क्लिप बाहेर आणून एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. परंतु यातून भाजपचे फंडे समोर येत आहे. याचा फायदा कोणाला आहे, हे तपासले गेले पाहिजेत. महायुतीमधील नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप थांबवले पाहिजे, असंही कडू माध्यमांशी बोलताना म्हणालेत.


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.