Ramesh Pardeshi Loses His Father: मराठी कलाविश्वातून अतिशय दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचे मित्र अभिनेते रमेश परदेशी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रमेश परदेशी (Ramesh Pardeshi) यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. रमेश परदेशी यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवर ही दु:खद माहिती शेअर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमेश परदेशी उर्फ पिट्या भाईंच्या वडिलांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. अशी माहिती पोस्टद्वारे प्राप्त झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमेश परदेशी यांच्या वडिलांचे 22 ऑक्टोबर रोजी निधन झाले असल्याची माहिती आहे. त्यांच्या पोस्टवर सिनेकलाकार तसेच चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे.
रमेश परदेशी यांच्या वडिलांचे नाव परशुराम परदेशी असल्याची माहिती आहे. त्यांच्या निधनानंतर रमेश परदेशी यांच्यावर आणि परदेशी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम परदेशी यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अंत्यसंस्कार पार पडले. पुण्यात अंत्यविधी पार पडले असल्याची माहिती आहे. परशुराम परदेशी यांच्या निधनानंतर रमेश परदेशी यांच्या अत्यंत जवळचे मित्र प्रवीण तरडे यांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे. तसेच परशुराम परदेशी यांच्यावर श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रवीण तरडे यांच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये रमेश परदेशी यांची महत्त्वाची भूमिका असते. अशातच रमेश परदेशी यांच्या वडिलांच्या निधनानंतर प्रवीण तरडे यांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. रमेश परदेशी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'माझे वडील. स्व. परशुराम लक्ष्मण परदेशी यांचे दिनांक 22 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास दु:खद निधन झाले. अंत्यविधी आज सायंकाळच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमी, पुणे येथे होणार आहे', असं त्यांनी म्हटलं आहे.
View this post on Instagram
प्रवीण तरडेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'मित्राचे वडील हे सुद्धा एक सुंदर नातं असतं. पिट्याचे वडील आज गेले. शुन्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं. लहानपणापासूनच्या त्यांच्यासोबत खूप आठवणी आहेत. मागील सहा महिन्यांपासून ते आजारी होते. पिट्याने त्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण ते वाचू शकले नाहीत. परमेश्वर दादांच्या आत्म्यास शांती देवो.. आणि पिट्याला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.. ओम शांती', असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.