Smita Jaykar Recalls Meeting Late Actor Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूला सहा वर्षांहून अधिक काळ लोटलाय, तरीही त्याचे चाहते त्याला विसरू शकलेले नाहीत. त्याच्याशी संबंधित काही ना काही गोष्टी अधूनमधून समोर येत असतात. अलीकडेच, त्याच्या बहीणीनं एक व्हिडिओ शेअर केलेला, ज्यामध्ये तिनं अभिनेत्याच्या शवविच्छेदनाबाबत (Post Mortem) नवे दावे केलेले. तिनं त्याच्या शरीरावरील जखमा आणि कदाचित एखाद्या शस्त्राचा वापर झाला असावा, असा उल्लेख केलेला. आता पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूतशी संबंधित चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी दावा ठरतोय, एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं केलेला दावा. मराठी अभिनेत्रीनं गौप्यस्फोट केलाय. मुलाखतीत बोलताना रिया चक्रवर्तीनं सुशांत सिंहच्या उपचारांसाठी माझ्याकडे मदत मागितल्याचा गौप्यस्फोट मराठी अभिनेत्री स्मिता जयकर यांनी केलाय. 


ज्येष्ठ अभिनेत्री आणि आध्यात्मिक उपचारतज्ज्ञ (Spiritual Healer) स्मिता जयकर यांनी दिवंगत अभिनेत्यासोबतच्या आपल्या भेटीबद्दल भाष्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की, रिया चक्रवर्तीच्या विनंतीवरून त्या सुशांतला भेटल्या होत्या, जेव्हा तो नैराश्यावर (Depression) रुग्णालयात उपचार घेत होता. स्मिता जयकर यांनी सांगितलं की, रिया चक्रवर्तीनं त्यांना सुशांतशी बोलण्याची विनंती केली होती, याआधी त्यांनी 'सोनाली केबल' (Sonali Cable) सिनेमात रियासोबत काम केलं होतं.


"सुशांत सिंह राजपूतच्या मनात आत्महत्येचे विचार यायचे..." (Smita Jaykar On Sushant Singh Rajput)


सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत बोलताना स्मिता जयकर यांनी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणावर चर्चा केली. त्यांनी सांगितलं की, जेव्हा त्या पहिल्यांदा सुशांतला भेटल्या, तेव्हा तो मुंबईतील एका रुग्णालयात होता आणि त्याची मानसिक स्थिती स्थिर नव्हती. स्मिता जयकर यांनी स्पष्ट केलं की, त्यांनी रियासोबत एका सिनेमात काम केलं होतं, त्यानंतर रियानं त्यांना सुशांतशी बोलण्याची विनंती केलेली. रिया चक्रवर्तीच्या सूचनेनुसार, त्या त्याला भेटण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या. त्यावेळी सुशांतच्या मनात आत्महत्येचे विचार होते. त्यांनी सांगितलं की, जेव्हा त्यांनी सुशांतशी संवाद साधला, तेव्हा तो त्यांच्याशी अतिशय आनंदानं आणि शांतपणे बोलला.


स्मिता जयकर यांनी सुशांतला दिलेली सूचना...


स्मिता जयकर म्हणाल्या की, "जेव्हा मी सुशांतला भेटले, तेव्हा तो आत्महत्येच्या विचारांशी संघर्ष करत होता. तो डिप्रेशनवर उपचार घेत होता. मी तिथे जाऊन त्याला एक 'हीलिंग सेशन' दिलं. मी त्याला घट्ट मिठी मारली, तो खूप भावूक झाला होता आणि त्यावेळी अत्यंत नाजूक मानसिक स्थितीत होता. रियानंच या 'हीलिंग सेशन'ची व्यवस्था केली होती. यादरम्यान, सुशांत माझ्याशी खूप चांगल्या प्रकारे बोलला आणि 'हीलिंग' सेशनमध्ये सहभागी होण्यासाठी आश्रमात जायलाही तयार झाला होता. मात्र, तसं घडू शकलं नाही. त्या रात्री उशिरा, रियानं मला मेसेज केला, 'स्मिता, तो पुन्हा एकदा अस्थिर मानसिक स्थितीत आहे. तो येऊ शकला असता तर किती बरं झालं असतं..."


अंमली पदार्थांशी संबंधित अफवा फेटाळल्या...


जेव्हा स्मिता जयकर यांना विचारण्यात आलं की, सुशांत सिंह राजपूत अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली होता का? तेव्हा त्यांनी अशा सर्व अफवा स्पष्टपणे फेटाळून लावल्या. त्यांनी ठामपणे सांगितलंय की, रुग्णालयात सुशांतला भेटले असता, त्यांना तिथे असं काहीही आढळलं नाही. याव्यतिरिक्त, त्यांनी रिया चक्रवर्तीची बाजू मांडताना म्हटलं की, रियाला केवळ सुशांतला मदत करायची होती. 'सोनाली केबल' या सिनेमात रियासोबत काम केल्याचा अनुभव सांगताना, स्मिता यांनी नमूद केलं की, रिया एक चांगली व्यक्ती आहे.


 


Sankarshan Karhade on Ashok Saraf: 'अशोक, तुला साखर आहे, जरा कंट्रोल ठेव...', निवेदिता सराफांनी खातानाच टोकलं; अशोक सराफांचं क्षणाचाही विलंब न लावता, थेट उत्तर!

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.