म. टा. प्रतिनिधी, पुणे: बारामती येथील उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाने शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे.मंत्र्यांना आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना मिळते, तशा पोलिस संरक्षणाची इच्छा मनात बाळगून उद्योजक राणा सूर्यवंशी यांनी स्वतःवरील जीवघेण्या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती पुणे ग्रामीणच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. बारामती तालुक्यातील गोजुबावी येथे झालेल्या या हल्ल्याच्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी तिसऱ्या आरोपीला अटक केली. त्यानंतर कटाचा उलगडा झाला.




या प्रकरणी पार्थ अवथडे आणि स्वप्नील कांबळे यांना यापूर्वी अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या तिघांकडे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. बारामती पोलिस ठाण्यात लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी (वय ४२, रा. सणसर, ता. ) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. लक्ष्मीकांत हे राणा सूर्यवंशी यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम करीत होते. रविवारी (१८ ऑक्टोबर) सायंकाळी राणा कामानिमित्त गोजुबावी येथे आले असता हल्लेखोरांनी शस्त्राने त्यांच्या उजव्या हातावर वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते.



महासंचालकांनी घेतले फैलावर




यांच्या सुरक्षारक्षकांच्या ताफ्यात तीन ते चार जिल्ह्यांतील पोलिस असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शुक्रवारी पोलिस महासंचालक कार्यालयातील बैठकीत हा मुद्दा ऐरणीवर आल्याचे समजते. या प्रकरणावरून पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी संबंधित जिल्ह्यांच्या युनिट कमांडरना फैलावर घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेशही देण्यात आल्याचे समजते. अतिरिक्त पोलिस महासंचालक निखिल गुप्ता यांच्याकडे या चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.



व्हीव्हीआयपी दर्जाच्या संरक्षणाची इच्छा




राणा सूर्यवंशी यांनी यापूर्वी पैसे भरून पोलिस संरक्षण घेतले होते. मात्र, मंत्र्यांना किंवा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना वाहनांचा ताफा आणि 'एस्कॉर्ट' सह ज्या प्रकारचे संरक्षण दिले जाते, तसे संरक्षण मिळावे, अशी त्यांची इच्छा होती, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. अशा संरक्षणासाठी ठरावीक नियमावली असून, संबंधित व्यक्तीला असलेला संभाव्य धोका आणि त्याबाबतची माहिती विचारात घेतली जाते.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.