पुणे : पुण्यातील रिसॉर्टवर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे, 1000 रुपयांमध्ये महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. मुंबई, पुण्यासह दिल्ली, कर्नाटक, पश्चिम बंगालच्या एकूण 13 मुलींची सुटका पोलिसांनी केली आहे. पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील रिसोर्टमध्ये वेश्या व्यवसाय (Pune Crime News) सुरू होता. राजगड पोलिसांनी एकाला अटक केली आहे, तर रॅकेटचा म्होरक्या फरार झाला आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वेळू येथील रिसॉर्ट वर पोलिसांनी छापेमारी करत 13 मुलींची सुटका केली आहे (Pune Crime News). राजगड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 22 ऑक्टोबर संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास वेळू येथील आमराई रिसॉर्टमध्ये करण्यात आली आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी वैभव बालाजी इंगळे आणि रघु शेट्टी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एकाला अटक करण्यात आली आहे.(Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 2 महिन्यांपासून आमराई रिसॉर्टमध्ये आरोपी शेट्टी हा महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावर पोलिसांनी संबंधित रिसॉर्टवर बनावट गिऱ्हाईक पाठवून तिथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकला. यावेळी त्या रिसॉर्ट वर एक हजार रुपयांमध्ये महिलांकडून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी रिसॉर्टची झडती घेतली असता त्या ठिकाणाहून 13 मुलींची सुटका करण्यात आली आहे, यातील पीडित तरुणी या मुंबई, ठाण्यासह, दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित रिसॉर्टच्या मालकी आणि व्यवस्थापनाबाबत आता अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. हे रिसॉर्ट एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याची असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संबंधित पदाधिकाऱ्याने इतर व्यक्तीकडे चालवायला दिल्याची देखील माहिती समोर आली आहे. पोलिसांना या बाबत विचारले असता संबंधित रिसॉर्ट कुणाच्या मालकीचे आहे याचा देखील तपास समांतर पद्धतीने सुरू असल्याचं सांगितलं. तसंच रिसॉर्टचे व्यवस्थापन त्यासोबत इतर काही लोक या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी आहेत का या अनुषंगाने देखील पोलिसांचा तपास सुरू आहे.
या प्रकरणात पोलिसांनी रिसॉर्टमधील आर्थिक व्यवहार आणि महिलांना आणण्यामागील यंत्रणेचा तपास सुरू केला आहे. सुटका करण्यात आलेल्या 13 तरुणींना या व्यवसायात कशा प्रकारे सहभागी करून घेतले जात होते, त्यांना पैशांचे आमिष दाखवण्यात आले होते का आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, रिसॉर्टमध्ये हा प्रकार सुरू असताना संबंधित व्यवस्थापनाची भूमिका काय होती, याचीही चौकशी केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात वैभव बालाजी इंगळे आणि रघु शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे. रॅकेटचा मुख्य सूत्रधार फरार असल्याची माहिती समोर आली आहे. रिसॉर्टच्या मालकीबाबत राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे नाव चर्चेत असले, तरी यासंदर्भात अधिकृत पुष्टी झालेली नाही. रिसॉर्टचा मालक, व्यवस्थापन आणि या संपूर्ण प्रकरणातील अन्य संभाव्य सहभागी व्यक्तींची माहिती तपासातून स्पष्ट होणार आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.