Nagpur Fake Currency News : नागपूरच्या चैतन्येश्वर नगरातील एका घरात मोठ्या प्रमाणावर नकली नोटांसारख्या छापलेल्या कागदांच्या कथित प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा संशयित आरोपी (Nagpur Crime News)  पुष्पम बंडाने परिसरात कोणाशीही फारसा संपर्क ठेवत नव्हता. एवढेच नाही तर तो घर मालकालाही घराच्या आत येऊ देत नव्हता. शिवाय गेले अनेक महिन्यांपासून त्यांनी घराचं भाडं थकवल्यामुळे शनिवारी घरमालकाने शेजारील काही लोकांना आणि मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन घर उघडून पाहिले असता घराच्या आत मोठ्या प्रमाणावर पाचशेच्या असली नोटांसारखे दिसणारे छापलेले कागद मोठ्या प्रमाणावर दिसून आले होते.


Nagpur Fake Currency News: नकली छापलेल्या नोट मिसळून व्यवहारात आणत असावा, अशी शंका


दरम्यान, प्रकरणाचं गांभीर्य लक्ष्यात घेता पोलिसांना पाचारण केल्यानंतर 500 च्या नोटांसारखं दोन्ही बाजूला छपाई असलेले जवळपास 37 लाख रुपये मूल्यांचे छापलेले कागद आढळून आले होते. तर नोटांची एक बाजू छापलेले जवळपास 45 लाख मूल्यांचे कागदही त्या ठिकाणी छापलेले आढळून आले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुष्पम बंडाने ने नकली नोटा छापण्याचा पराक्रम का केला असावा? याबद्दल अजून स्पष्टता नाही. मात्र स्थानिक नागरिकांनी पुष्पमची वर्तणूक पाहता तो मोठ्या प्रमाणावर असलेल्या असली नोटांमध्ये काही संख्येने या नकली छापलेल्या नोट मिसळून व्यवहारात आणत असावा, अशी शंका व्यक्त केली आहे.


Fake Currency News: नुकतंच बँकेत एक लाख रुपये जमा केल्याचे बँकेची पावती


विशेष म्हणजे घरचं अनेक महिन्याचं घरभाडं थकवणाऱ्या पुष्पमने नुकतंच एका बँकेत एक लाख रुपये जमा केल्याचे त्याच्या घरी सापडलेल्या बँकेच्या कागदपत्रावरून दिसून आले आहे. त्यामुळे तो एवढ्या मोठ्या प्रमाणावर छापलेल्या नकली नोटांसारख्या दिसणारा कागदांचा वापर कुठे करत होता? याबद्दल अनेक शंका निर्माण झाल्या आहे. दरम्यान पुष्पमंडाने अजूनही फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.


Nagpur Crime News : घरमालकासोबत वाद, चाकू दाखवत धमकी, पोलिसांनी तेव्हाच कारवाई केली असती तर...


दरम्यान घरमालकांनी दिलेल्या धक्कादायक माहितीनुसार पुष्पमंडाने ने यापूर्वीही भाडं देण्याच्या मुद्द्यावरून घरमालकासोबत वाद घालत त्यांना धमकी देताना चाकू दाखवले होते. त्याची रीतसर तक्रार वाठोडा पोलीस स्टेशनमध्ये करूनही पोलिसांनी तेव्हा कुठलीही कारवाई केली नव्हती. जर पोलिसांनी तेव्हाच कारवाई केली असती तर नकली नोटांचा हे प्रकरण तेव्हाच समोर आले असते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.