Sankarshan Karhade on Grandmother Parbhani: प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) सध्या 'आदि अनंत' (Aadi Anant) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात संकर्षण कऱ्हाडे व्यतिरिक्त अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. महेश लिमये (Mahesh Limaye) दिग्दर्शित हृदयाला स्पर्श करणारा चित्रपट 12 नोव्हेंबर 2026 रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात सखी गोखले, वैदेही परशुरामी या अभिनेत्रींचीही महत्त्वाची भूमिका आहेत. 'आदि अनंत' या सिनेमातील कलाकार सध्या 'आदी अनंत'च्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. अलिकडेच संकर्षण कऱ्हाडे यांनी अभिजात मराठी फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत संकर्षण कऱ्हाडे यांनी 'आदि अनंत' या चित्रपटाच्या संबंधित आणि विविध विषयांवर चर्चा केली. संकर्षण कऱ्हाडे यांनी आपल्या आजीच्या (Sankarshan Karhade Grandmother) संबंधित एक किस्सा सांगितला. त्यांच्या आजीने, चोरालाही चहा पाजला असल्याचं सांगितलं. नेमका किस्सा काय? जाणून घेऊयात.
संकर्षण कऱ्हाडेने अभिजात मराठी फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत आपल्या आजीबद्दल बोलताना संकर्षण कऱ्हाडे म्हणाले की, 'माझ्या आजीने चोरालाही चहा पाजला आहे. परभणीत विद्यानगर म्हणून एरिया आहे. त्रिमुर्तीनगरच्या परिसरात घर आहे. तिथे माझी आजी राहायची. घर अतिशय लहान, 2-3 खोल्यांचं घर आहे. तिथे पेरु, चिकू, सिताफळ, अंब्याची झाडं आहे. झाडांनी वेढलेलं आमचं घर. घरात कधी कधी सापही शिरायचा. गावाच्या बाह्य भागामध्ये असलेलं घर होतं. एके दिवशी रात्री अडीच - तीन वाजता घरात काहीतरी जोरात वाजलं. अण्णा आमचे बाहेर गेले होते. तिने पाहिलं. आजी म्हणाली की, मागच्या दाराने घुसलं होतं चोरटं'.
'तिने आम्हाला हा किस्सा सांगितला. मी म्हणालो की, तुला भीती नाही का वाटली? आजी चोरट्याला म्हणाली की, घरात चोरण्यासारखं काहीही नाही. मी सणावाराला राखून ठेवलेले हजार - 2 हजार रुपये आहेत. पेन्शनमधले काही पैसे आहेत. 500 ठेव तुला, पाहिजे तर तुला सगळे ने. घरात तर काही नाही बुवा, असं आजी चोरट्याला म्हणाली. दोघांमध्ये संभाषण झालं. 'आता कुठे चाललास? चहा घेऊन जा', असं आजी चोरट्याला म्हणाली. चोरट्याने त्याच्या घरच्यांबद्दल माहिती दिली. चोरी का करतो, हे देखील सांगितलं. चोरटा आजीला म्हणाला की, मावशी पाऊसच नाही तर काय करायचं? वर्षानुवर्ष शेती फक्त पाण्यावर आहे आणि पाऊसच नाही. अन्न धान्य मिळवायचं कुठून?'.
'बरं ते दरोडेखोर, हल्लेखोर असे नाहीत. उपजीविकेसाठी काहीतरी हवं ना? करणार काय? मावशी पाऊस नाही, कुठे काय मिळतं का बघायचं. आजी म्हटली चोरट्याला, बस. पहाटे 4, साडेचार वाजता आजीने चहा ठेवला. दोघेही चहा प्यायले. नंतर तो निघून गेला. काहीही नेलं नाही. अशा आजी आजोबांना मी अनुभवलेलं आहे, जवळून पाहिलं आहे. त्यामुळे, ती माणसं, माणसांना किंमत देणं, भोवतालच्या घटनेविषयी आपल्या मनामध्ये ममत्व असणं. मला खूप जवळून माहिती आहे', असं संकर्षण कऱ्हाडे म्हणाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.