Jio IPO GMP: जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ या देशातील सर्वात मोठ्या इश्यूमध्ये छोट्या-मोठ्या सर्व गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. तीन दिवसांच्या सबस्क्रिप्शन दरम्यान हा आयपीओ 22 पटींनी ओव्हरसबस्क्राइब झाला तर, जिओ प्लॅटफॉर्म्सचे शेअर्स अनलिस्टेड ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम दराने ट्रेड होत आहेत.



जिओ आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम कितीबुधवार, 28 ऑक्टोबर रोजी, देशांतर्गत बाजारात जिओ प्लॅटफॉर्म्सचे शेअर्स लिस्ट होणार असून त्याआधी सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या व्यवहार दिवशी, आयपीओचे अलॉटमेंट अंतिम केले जाईल. जिओ प्लॅटफॉर्म्सच्या 30,213 कोटींच्या आयपीओला तीन दिवसांत 1.38 कोटींहून अधिक सबस्क्रिप्शन मिळाले आणि इश्यू एकूण 22 पटींनी ओव्हरसबस्क्राइब झाला. अँकर आणि नॉन-अँकर गुंतवणूकदारांकडून एकूण बोली अंदाजे 7.40 लाख कोटींपर्यंत पोहोचली, तर सर्वांचे लक्ष जिओ किती फायदा मिळवून देतो? याकडे लागून असेल.




जिओ प्लॅटफॉर्म्स बीएसई-एनएसईवर सूचीबद्ध होण्यापूर्वीच मुकेश अंबानींच्या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये तेजीसह व्यवहार करत आहेत. ग्रे मार्केटमधील व्यवहारानुसार Jio IPO गुंतवणूकदारांना निराश करणार नाही आणि लिस्टिंगवर चांगला नफा मिळवून देईल.




अनलिस्टेड बाजारात कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध 1,366 वर ट्रेड होत आहेत, जे आयपीओच्या 1,119 रुपयांच्या उच्च किंमत बँडपेक्षा 22.07% जास्त आहे. लक्षात घ्या की ग्रे मार्केटमधील संकेत लिस्टिंगनंतर नफ्याची हमी देत ​​नाही, पण लिस्टिंग होईपर्यंत ग्रे मार्केट प्रीमियम स्थिर राहिला तर, गुंतवणूकदारांना प्रीमियम लिस्टिंग फायदा मिळू शकतो.




एका लॉटवर किती नफा होणार?जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPO मध्ये प्रत्येक लॉट 12 शेअर्स आहेत, तर ग्रे मार्केट प्रीमियमवर आधारित संभाव्य नफ्याचे कॅलक्युलेशन खालीलप्रमाणे असेल : -



आयपीओची कमाल किंमत मर्यादा: 1,119 रुपये



ग्रे मार्केट किंमत: 1,366 रुपये



जीएमपी प्रति शेअर: 247 रुपये



एका लॉटमधील शेअर्स: 12



आयपीओच्या एका लॉटची किंमत : 13,428 रुपये



अंदाजित लिस्टिंग किंमत: 16,392 रुपये



एका लॉटवर संभाव्य नफा: 2,964 रुपये




अशा परिस्थितीत, सध्याच्या GMP नुसार, एका लॉटवर गुंतवणूकदाराला अंदाजे 2,964 रुपयांच्या नफ्याचे संकेत मिळत आहेत. पण केवळ ग्रे मार्केट प्रीमियमवर आधारित एक अंदाज आहे. वास्तविक लिस्टिंग किंमत जास्त किंवा कमी असू शकते.




जिओ आयपीओचे लिस्टिंग कसे चेक करायचेविक्रमी बोलीनंतर, जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओ च्या वाटपाची प्रक्रिया आज, 26 ऑक्टोबर रोजी पूर्ण होऊ शकते. आता गुंतवणूकदार शेअर्स मिळाले आहेत की नाही, हे तपासण्यासाठी आयपीओ allotment status पाहू शकतात. गुंतवणूकदार KFin टेक्नॉलॉजीज (इश्यू रजिस्ट्रार), बीएसई आणि एनएसईच्या अधिकृत वेबसाइटवर, जिथे संबंधित पर्याय उपलब्ध असेल तिथे, आपला पॅन किंवा अर्ज क्रमांक टाकून जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओ वाटपाची स्थिती तपासू शकतात.



(Disclaimer : वरील तपशील केवळ माहितीसाठी आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमच्या नफा किंवा तोट्यास लेखक किंवा महाराष्ट्र टाइम्स व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.​​)

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.