मुंबई : नेपाळमध्ये आजपासून नेपाळ क्रिकेट लीगला आजपासून सुरूवात होत आहे. मात्र लीग सुरू होण्याआधी एक मोठा वाद समोर येतान दिसत आहे. आयोजकांनी पीसीबीवर खळबळजनक आरोप केले असून एकप्रकारे खंडणीच मागत असल्याचं त्यांनी म्हटलंय. नेपाळ प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंना (NOC) 'नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट'साठी एका खेळाडूमागे २५ हजार अमेरिकन डॉलर मागत आहेत. म्हणजेच प्रत्येक पाकिस्तानी खेळाडूसाठी त्यांना २३ लाख रूपये द्यावे लागणार आहेत. क्रिकइन्फोनेही याबाबत माहित दिली असून अनेक खेळाडूंना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप NOC दिलेली नाही. इतकंच नाहीतर ज्या खेळाडूंना NOC मिळाली होती ती होल्डवर ठेवल्याचं सांगण्यात येत आहे.




पाकिस्तानचे कर्णधार साहिबजादा फरहान, हैदर अली, हुनैन शाह, हुसैन तलत, इफ्तिखार अहमद, हसन अली आणि उसामा मीर यांसारखे स्टार खेळाडू खेळणार होते. पण आता केलेल्या पैशांच्या मागणीमुळे आयोजकांची गोची झाली आहे. ऐनवेळी पाकिस्तानकडून पैशांची मागणी केली गेल्याने आता इतक्या कमी वेळात खेळाडूंचा बदली खेळाडू शोधणे अशक्य आहे. पाकिस्तानचे काही खेळाडू तर काठमांडू येथे पोहोचले असून आता लीगलाही सुरूवात होणार आहे. मात्र एनओसी नसल्यामुळे तेसुद्धा अडकून पडले आहेत. जे खेळाडू अजून नेपाळला पोहोचलेले नाहीत, त्यांनी हा एनओसीचा वाद मिटेपर्यंत आपले तिकिट्स आणि प्लॅन्स थांबवून ठेवले आहेत.




पाकिस्तानने याआधीही उकळलेत पैसेमेजर लीग क्रिकेटवेळीही पीसीबीने असेच केले होते. एमएलसीमध्ये अशी पैशांची मागणी करणारा पीसीबी हा जगातील एकमेव क्रिकेट बोर्ड होतं. तेव्हा संतप्त झालेल्या काही फ्रेंचायझी मालकांनी पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्याशी संपर्क साधला होता, तर काहींनी या पद्धतीला थेट 'खंडणी'चं म्हटलं होतं. त्या सीजनमध्ये सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सकडून खेळणारा हॅरिस रॉफ हा एमएलसीमधील एकमेव पाकिस्तानी खेळाडू होता आणि त्याची फ्रँचायझीसुद्धा फी देण्यास तयार झाली होती. परदेशी लीगमधील एनओसी हा पीसीबी आणि त्यांच्या खेळाडूंमधील वादाचा जुना विषय आहे. त्यामुळे यावर काय तोडगा काढला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.




नेपाळ क्रिकेट लीगमध्ये खेळणारे भारतीय खेळाडूबीसीसीआयच्या नियमांनुसार, जे खेळाडू भारतीय क्रिकेट आणि आयपीएलमधून अधिकृतपणे निवृत्त झाले आहेत किंवा परदेशात क्रिकेट खेळत आहेत, त्यांनाच या लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळते. भारताचा माजी दिग्गज सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने कर्नाली याक्स संघाकडून खेळत या स्पर्धेत मोठी भूमिका बजावली आहे. त्याच्यासोबतच भारताचा माजी अंडर-१९ विश्वकरंडक विजेता कर्णधार उन्मुक्त चंद, अष्टपैलू खेळाडू ऋषी धवन, के. एस. भरत, स्मित पटेल, अनुभवी वेगवान गोलंदाज अभिमन्यु मिथुन आणि शेल्डन जॅक्सन यांसारख्या खेळाडूंनी नेपाळमधील विविध संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.