दिवाळी जवळ आली की घराची साफसफाई, खरेदी, फराळाची तयारी आणि पाहुण्यांच्या स्वागताची लगबग सुरू होते. पूर्वी घरातील सर्वजण मिळून साफसफाई करत असत; मात्र आता अनेक जण नोकरी, व्यवसाय आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे दिवसभर व्यस्त असतात. अशा वेळी दिवाळीची साफसफाई करण्यासाठी स्वतंत्र वेळ काढणे अनेकांना कठीण जाते. घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ करण्यापासून ते पडदे धुणे, फर्निचरवरील धूळ काढणे आणि स्वयंपाकघर आवरण्यापर्यंत अनेक काम असतात. त्यामुळे बदलत्या लाईफस्टाईलनुसार काही स्मार्ट उपायांचा वापर केल्यास वेळ आणि मेहनत दोन्ही वाचू शकतात.
साफसफाईसाठी ऑनलाइन मदत
हल्लीच्या डिजिटल युगात घरकामासाठी मदत मिळवणे सोपे झाले आहे. विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि अॅप्सच्या माध्यमातून घराची साफसफाई, डस्टिंग, स्वयंपाकघराची स्वच्छता किंवा दिवाळीपूर्वी घर आवरण्यासाठी मदतनीस बोलावता येतात. काही सेवा तासांनुसार, तर काही कामाच्या स्वरूपानुसार शुल्क आकारतात. सेवा निवडताना कामाचे स्वरूप, उपलब्ध वेळ, शुल्क आणि ग्राहकांचे अभिप्राय तपासणे महत्वाचे आहे.
भागांनुसार साफसफाई करा
एकाच दिवशी संपूर्ण घर आवरण्याचा ताण घेण्याऐवजी दररोज एका भागाची साफसफाई करा. पहिल्या दिवशी कपाटे, दुसऱ्या दिवशी स्वयंपाकघर, तर पुढील दिवशी हॉल आणि बेडरूम आवरता येतील. यामुळे कामाचा ताण कमी होतो आणि प्रत्येक भाग व्यवस्थित स्वच्छ करता येतो.
न वापरणाऱ्या वस्तू काढा
कपाटे, ड्रॉवर आणि स्वयंपाकघरातील न वापरल्या जाणाऱ्या वस्तू आधी वेगळ्या करा. गरजेच्या, दान करण्याच्या आणि टाकून देण्याच्या वस्तूंचे स्वतंत्र वर्गीकरण करा. त्यामुळे साफसफाई करताना अनावश्यक वस्तू पुन्हा पुन्हा हलवण्याची गरज पडणार नाही.
स्मार्ट उपकरणांचा वापर
व्हॅक्यूम क्लीनर, हँडहेल्ड डस्टर आणि योग्य साफसफाईची साधने वापरल्यास धूळ काढण्याचे काम कमी वेळात करता येते. फर्निचरवर वारंवार धूळ साचत असेल, तर व्हॅक्यूम क्लीनर उपयोगी ठरू शकतो. उपकरण निवडताना घराचा आकार, वापर आणि बजेट लक्षात घ्या.
आधीच नियोजन करा
कामांची यादी तयार करा, वेळ ठरवा आणि आवश्यक साहित्य आधीच आणून ठेवा. गरजेनुसार मदत घ्या आणि स्वतःवर सर्व जबाबदारी घेऊ नका. थोडे नियोजन आणि स्मार्ट उपाय यांच्या मदतीने दिवाळीपूर्वी घर स्वच्छ ठेवता येईल आणि सणाचा आनंद घेण्यासाठीही वेळ मिळेल.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.