पुणे : पुणे शहर पोलीस उपआयुक्त विशेष शाखा यांनी नुकतीच 23 ऑक्टोबरला पार पडलेल्या पोलीस संरक्षण गठीत समितीच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. पुणे शहरातील 25 हून अधिक व्यक्तींना (Pune Police Security) पुरवण्यात आलेले पोलीस संरक्षण पोलीस उप आयुक्त प्रशांत अमृतकर विशेष शाखा यांच्या आदेशानुसार काढण्यात आलेले आहे, तर सध्या फरार असलेला उद्योगपती राणा सूर्यवंशी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे पोलीस संरक्षण जैसे थे ठेवल्याचं समोर आलं आहे . 24 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रातून सदर बाब समोर आली आहे. राणा सूर्यवंशी याला वाय प्लस एस्कॉर्ट दर्जाचे संरक्षण पुरवण्यात आले आहे, तर लक्ष्मण हाके यांना देखील 1+1 सशस्त्र गणमॅन एस्कॉर्ट वाहनासह पुरवण्यात आले आहे. ज्यांचे संरक्षण काढण्यात आले आहे, यामध्ये ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात (Pune Police Security) आलेले विद्यानंद बापट, सरहद संस्थेचे संजय नहार, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, कोरेगाव भीमा प्रकरणाचे वकील आशिष सातपुते, सिरम इंस्टिट्यूटचे सायरस पुनावाला, पुनीत बालन, राजकीय विश्लेषक तेहसिन पुनावाला, फिल्म निर्माता मिहिर कुलकर्णी, अजिंक्य डी.वाय.पाटील, व्यावसायिक मिशेल योहान पुनावाला आणि योहान झवेरी पुनावाला यासह काही बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे.(Pune Police Security)
पुणे शहर पोलीस उपायुक्त यांची विशेष शाखा ही महिन्यात किंवा दोन महिन्यानंतर सुरक्षेचा शहरामधला आढावा घेत असते आणि आढाव्याच्या निमित्ताने कुणाची सुरक्षा ठेवायची, कोणाची सुरक्षा वाढवायची किंवा कोणाची सुरक्षा काढायची याची ती आढावा बैठक असते. नुकतीच 23 तारखेला या संदर्भातली एक बैठक महत्त्वाची पार पडलेली आणि या बैठकीमध्ये सुरक्षेचा आढावा घेण्यात आल्याची बाब आता समोर आली. याच्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर सगळ्यात धक्कादायक बाब अशी आहे की, जो सध्या फरार आहे, बारामती विमानतळाजवळ ज्याच्यावर हल्ला झाला होता, त्यानंतर रुबी हॉस्पिटलला नेलं तो राणा सूर्यवंशी नावाचा बारामतीतील उद्योगपती फरार आहे, असं असताना देखील त्या संबंधित उद्योगपतीला वाय प्लस दर्जाची सुरक्षा जी आहे, ती जैसे थे ठेवण्यात आल्याची बाब आता समोर आलेली आहे. यासोबतच राजकारणी आणि ओबीसी नेते असणारे लक्ष्मण हाके यांची देखील सुरक्षा आहे, ती जैसे थे ठेवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये कोणाकोणाची सुरक्षा काढली तर साधारणपणे 19 जणांची नाव आता एबीबी माझाच्या हाती आली आहेत,(Pune Police Security)
राणा सूर्यवंशी याला वाय प्लस एस्कॉर्ट दर्जाचे संरक्षण पुरवण्यात आले आहे, तर लक्ष्मण हाके यांना देखील 1+1 सशस्त्र गणमॅन एस्कॉर्ट वाहनासह पुरवण्यात आले आहे. ज्यांचे संरक्षण काढण्यात आले आहे यामध्ये ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले विद्यानंद बापट, सरहद संस्थेचे संजय नहार, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, कोरेगाव भीमा प्रकरणाचे वकील आशिष सातपुते, सिरम इंस्टिट्यूटचे सायरस पुनावाला, पुनीत बालन, राजकीय विश्लेषक तेहसिन पुनावाला, फिल्म निर्माता मिहिर कुलकर्णी, अजिंक्य डी.वाय.पाटील, व्यावसायिक मिशेल योहान पुनावाला आणि योहान झवेरी पुनावाला यासह काही बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. मोठ्या उद्योगपतींचा, राजकीय विश्लेषकांचा, यामध्ये समावेश आहे, फिल्म निर्माते देखील याच्यामध्ये आहेत, तर पुण्यातले काही महत्त्वाचे बांधकाम व्यवसायिक यांची देखील सुरक्षा आता कमी करण्यात आली अशी बाब समोर आली आहे, या संदर्भातले महत्त्वाचे जे कागदपत्र आहे ते देखील एबीपी माझाच्या हाती लागलेले आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.