Yavatmal Digras Crime News : यवतमाळच्या दिग्रसमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. युवतीला लग्नाचे आमिष दाखवून धर्मांतर (Religious conversion) केल्याची धक्कादायक घटना या ठिकाणी उघडकीस आलीय. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून (Yavatmal Crime News) दिग्रस पोलिस ठाण्यात (Digras Police Station) तिघाजणांविरुद्ध महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, पीडित युवतीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून (Digras Crime News) शेख समीर शेख नूर (30), त्याचे वडील शेख नूर (55), रा. मोतीनगर, दिग्रस व मित्र शेख बिलाल (29), रा. चांदनगर, दिग्रस यांनी मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावरही दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Yavatmal Digras Crime News)


Digras Crime News: लग्नाचे आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणल्याचा आरोप; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित युवती ही 29 सप्टेंबरला सकाळी कॉलेजचे हॉल तिकीट आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र बराच वेळनंतरही ती परतच आली नाही. ती परत न आल्याने दुसऱ्या दिवशी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कुटूंबियांनि दिग्रस पोलीस ठाण्यात दिली. अशातच 8 ऑक्टोबरला शेख समीर शेख नूर याने युवतीचे धर्मांतर करून तिच्याशी लग्न केल्याची माहिती पीडितेच्या आईला मिळाली. यात लग्नाचे आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. त्यावरून तिघांविरुद्ध दिग्रस पोलिसांनी महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिलीय.


 Chandrapur Crime: घरकुल यादीत घोळ केल्याप्रकरणी माजी सरपंचावर गुन्हा दाखल



 घरकुल यादीत घोळ केल्याप्रकरणी एका माजी सरपंचावर चंद्रपूर जिल्ह्यातील मूल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोनी देशमुख असं या माजी सरपंचाचं नाव असून ते मूल तालुक्यातील चांदापूर येथील माजी सरपंच आहेत. याप्रकरणी चांदापूरच्याच माजी उपसरपंचाकडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या चौकशीअंती आरोप सिद्ध झाल्याने पंचायत विस्तार अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

इतर महत्वाच्या बातम्या





Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.