Amravati Accident News: अमरावती - नागपूर महामार्गावर एक भीषण अपघात (Amravati-Nagpur Highway Accident) घडलाय. तिवसा तालुक्यातील वरखेड फाट्यानजीक दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडलीय. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. नागपूर - अमरावती महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झालाय. तर निखिल बोके आणि कैलास कळंबे या दोन तरुणांचा यात जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही उंबरखेड येथील रहिवासी असून तिवस्याहून गावी जाताना ही अपघाताची घटना घडली आहे.


Amravati Accident News: बाळाच्या जन्माआधीच पित्याचं छत्र हरपलं;उंबरखेड गावात हळहळ


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळ गाठत कारवाई सुरु केली. यात ट्रॅव्हल्स चालकाला ताब्यात घेतले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू. कैलास यांची पत्नी आठ महिन्यांची गर्भवती आहे. पुढील महिन्यात त्यांची प्रसूती होणार होती. मात्र बाळाच्या जन्माआधीच पित्याचे छत्र हरपले. या दुर्दैवी घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून उंबरखेड गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Bhnadara News : कबड्डीचा सराव करताना लागला विजेचा धक्का; विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू


दुसरीकडे भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये अशीच एक दुदैवी घटना घडली आहे. सहकारी वर्ग मित्रांसोबत शाळेच्या छतावर कबड्डीचा सराव करताना तिथून गेलेल्या उच्च दाब विद्युत वाहिनीच्या जिवंत तारांना स्पर्श झाल्यानं विद्यार्थ्याला जबर धक्का बसला होता. ही घटना गुरुवारी भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील सिहोरा येथील आदर्श हायस्कूल इथं घडली होती. दरम्यान, गंभीर जखमी विद्यार्थ्यावर नागपूर इथं उपचार सुरू असताना काल सायंकाळी या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अर्णव शेंद्रे असं या 14 वर्षीय मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचं नावं आहे. शाळेच्या इमारतीवरून जिवंत विद्युत वाहिनीच्या तारा गेलेल्या असल्यानं ही दुर्घटना घडली. अर्णव याची उत्कृष्ट कबड्डीपटू आणि अभ्यासात अत्यंत हुशार मुलगा म्हणून ओळख होती. त्याच्या अकाली निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.


Chandrapur : 4 वर्षीय मुलावर वाघाच्या बछड्याचा हल्ला, ब्रम्हपुरी तालुक्यातील चांदगाव येथील घटना


चंद्रपूर जिल्ह्यात एका 4 वर्षीय मुलावर वाघाच्या बछड्याने हल्ला करत त्याला जखमी केलय. ब्रम्हपुरी तालुक्यातील चांदगाव येथील ही घटना असून सुदैवाने त्या मुलाच्या चुलत भावाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे चिमुकल्याचा जीव बचावलाय. 4 वर्षीय मयंक वलके हा आपल्या चुलत भावासोबत गावातीलच आत्याकडे जात होता. त्यावेळी आत्याच्या घराजवळच त्याच्यावर वाघाच्या बछड्याने हल्ला केला. मात्र त्याचवेळी त्याच्या चुलत भावाने प्रसंगावधान राखून जोर जोरात ओरडल्याने वाघाने पळ काढला. जखमी मुलाला उपचारासाठी ब्रम्हपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयात भरती करण्यात आले असून या घटनेमुळे गावात सध्या भीतीचं वातावरण आहे.



 

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.