Sachin Pilgaonkar on Madhuri Dixit Prem Deewane: ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी अलिकडेच 'कोण होणार करोडपती'मध्ये (Kon Honar Crorepati) हजेरी लावली. सूत्रसंचालक माधुरी दीक्षितसोबत (Madhuri Dixit) अनेक किस्से आणि गोष्टी रंगल्या.  सचिन पिळगावकर आणि माधुरी दीक्षित यांनी 'प्रेम दीवाने' या सिनेमात काम केलं होतं.   हा सिनेमा 1992 साली प्रदर्शित झाला होता.  'प्रेम दीवाने' या सिनेमात माधुरी दीक्षितने पहिल्यांदाच इन्पेक्टरची  भूमिका साकारली होती. सचिन पिळगावर आणि माधुरी दीक्षितव्यतिरिक्त या सिनेमात  जॅकी श्रॉफ, पूजा भट्ट, रीमा लागू यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  विशेष म्हणजे 'प्रेम दीवाने' या सिनेमाचं दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केलं होतं. 'प्रेम दीवाने' या सिनेमाचा एक किस्सा सचिन पिळगावकर यांनी 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर शेअर केला.   किस्सा ऐकताच माधुरी दीक्षित लाजून हसली. नेमका किस्सा काय? जाणून घेऊयात.


सचिन पिळगावकर यांनी सांगितला 'प्रेम दीवाने' या सिनेमातील किस्सा (Sachin Pilgaonkar Reveals Prem Deewane story)


माधुरी दीक्षित हिने आपली ओळख रोमँटिक फिल्म आणि डान्समधून तयार केली होती. इन्स्पेक्टरच्या भूमिकेत माधुरी दीक्षित कशी फिट होईल? हा विचार सचिन पिळगावकर यांच्या मनात आला कसा? माधुरी दीक्षितला 'प्रेम दीवाने' या सिनेमात इन्स्पेक्टरच्या भूमिकेसाठी निवडण्याची प्रेरणा सचिन पिळगावकर यांना प्रेरणा नेमकी कशातून मिळाली. यावर उत्तर देताना सचिन पिळगावकर म्हणाले की, 'मी त्याआधी तुझा 'अबोध' हा चित्रपट पाहिला होता. मला त्यातील तुझं काम प्रचंड आवडलं होतं. तो सिनेमा पाहिल्यानंर मला असं वाटलं की, 'प्रेम दीवाने' या सिनेमासाठी  माधुरी दीक्षित परफेक्ट असेल. मला खात्री होती की, तू या सिनेमात इन्स्पेक्टरची भूमिका उत्तम साकारु शकशील'. 


सचिन पिळगावकर यांनी माधुरी दीक्षितवर दाखवलेल्या विश्वासावर अभिनेत्रीने आभार मानले.  'माझ्यावर एवढा विश्वास ठेवल्याबद्दल थँक यू. म्हणून मला माझ्या कारकिर्दीत काहीतरी वेगळं  करायला मिळालं', असं माधुरी दीक्षित म्हणाली.  सचिन पिळगावकर  यांनी यावेळी या सिनेमाच्या संबंधित आणखी एक किस्सा शेअर केला. 'त्यावेळी माधुरी दीक्षितला एका गोष्टीचा खूप राग आला होता.  'प्रेम दीवाने' या सिनेमात तिचं नाव मी शिवांगी असं ठेवलं होतं.  शिवांगी म्हटल्यावर माधुरीसमोर वांगी यायची, अन् तिला वांगी आवडत नाही.  ती मला म्हणायची की, हे काय  वांगी - वांगी, वांगी मला नकोत'. हा किस्सा ऐकून प्रेक्षकांमध्ये हशा पिकला.  माधुरी दीक्षित लाजून हसली.


महत्त्वाच्या इतर बातम्या:


Mahesh Kothare on Laxmikant Berde: 'पहाटे 3 वाजता फोन आला अन् पायाखालची जमीन...'; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मृत्यूची बातमी ऐकताच महेश कोठारेंना बसलेला धक्का

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.