Rashmika Mandanna On Vijay Deverakonda Cares: साऊथ सिनेसृष्टीतलं (South Film Industry) पॉवर कपल म्हणून ओळखले जाणारे, रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda), चाहत्यांचंही लाडकं कपल आहे. दोघांमधली केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. कित्येक वर्षांपासून दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलेलं. अखेर दोघांनीही शाही विवाहसोहळ्यात आपली लग्नगाठ बांधली आणि साताजन्माची वचनं घेतली. अशातच, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना रश्मिकानं तिच्या आणि विजय देवरकोंडा यांच्या नात्यातल्या जिव्हाळ्यावर भाष्य केलंय. मुलाखतीत बोलताना रश्मिकानं मासिक पाळीवर वक्तव्य केलंय. लग्नानंतर विजय देवरकोंडा तिची खूप काळजी घेतो. इतकंच नाहीतर, तिला मासिक पाळी आल्यानंतरही तो तिला काय हवं-नको ते सर्वकाही पाहतो, असं तिनं सांगितलं. रश्मिकानं मुलाखतीत बोलताना बऱ्याच वैयक्तिक गोष्टींवर भाष्य केलंय. ज्यावर आता चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया दिल्या जातायत. 


साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (South Actress Rashmika Mandanna) हिनं 'मिड-डे'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तिनं तिच्या वैयक्तिक आयुष्यातला एक किस्सा सांगितला. "मी कोणत्या परिस्थितीतून जातेय आणि मला कसं वाटतंय, हे त्याला समजतंय. मी माझ्या मनातल्या गोष्टी मोकळेपणानं मांडणारी व्यक्ती आहे. जर मला विनाकारण उदास वाटलं, तर मी त्याला सांगते, 'बघ, काही दिवसांत माझे पीरियड्स सुरू होणार आहेत, मला फक्त तुझ्या सोबतीची आणि प्रेमाची गरज आहे... मी त्याला आधीच कल्पना देऊन ठेवते..."


अभिनेत्री रश्मिका मंदाना म्हणाली की, "एका पुरुषाकडून तुम्ही यापेक्षा जास्त काय अपेक्षा ठेवू शकता? तो माझ्या पाठीशी आहे, हे जाणून खूप दिलासा मिळतो. माझ्या पीरियड्समध्ये तो माझ्या पोटाला मालिश करतो, तसेच माझ्या हाता-पायांना मसाज करतो, कारण त्यांना वाटतं की, किमान एवढं तरी ते करू शकतात..." पुढे बोलताना रश्मिका म्हणाली की, "मला होणारा त्रास थांबवण हे जरी त्याच्या हातात नसलं तरी तो आपल्यासाठी सर्व काही करतो. या सगळ्यात माझी प्रचंड चिडचिड होतं असते, पण तो समजून घेतो. मला काय हवंय, काय नको,कशाची गरज आहे हे विजय बरोबर समजून घेतो. वेळोवेळी मला हसवण्याचा, माझ मूड कसा चांगला राहिल याचाही प्रयत्न करत असतो..." 


रश्मिकाने मासिक पाळीबद्दल समाजात अधिक समजूतदारपणा असण्याची गरज असल्याचंही म्हटलंय. तसेच, सिनेमाच्या शूटिंगदरम्यान महिलांना होणाऱ्या त्रासाची दखल घेणं आवश्यक असल्याचंही रश्मिकानं मुलाखतीत म्हटलंय. 


दरम्यान, रश्मिका आणि विजय यांच्यातील पडद्यामागच्या प्रेमसंबंधांबाबत बरीच चर्चा होती, मात्र या दोन्ही कलाकारांनी या विषयावर बोलणं नेहमीच टाळलंय. अखेर, 26 फेब्रुवारी 2026 रोजी दोन्ही सुपरस्टार विवाहबंधनात अडकले. त्यांनी राजस्थानमध्ये तेलगू आणि कोडवा अशा दोन्ही परंपरांनुसार लग्न केलं.


 


Milind Gawli Became Grandfather: 'आमच्या घरी गौराई आली, आभाळ ठेंगणं झालंय...', अभिनेते मिलिंद गवळी यांची गूड न्यूज देणारी पोस्ट, गोंडस नातीसोबतचा फोटो शेअर करत म्हणाले...

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.