Virar Crime News विरार: विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरातील एका बंद फ्लॅटमध्ये दोन भाऊ आणि त्यांच्या बहिणीचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ (Virar Global City News) उडाली आहे. कुमार मनसुखलाल मेहता (वय 50), दिपेश मनसुखलाल मेहता (वय 52) आणि खेवणा मनसुखलाल मेहता (वय 48) अशी मृतांची नावे आहेत. तिघांनी विषप्राशन करून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


सदर घटना विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी येथील के-3-डी, गार्डन अॅव्हेन्यू या इमारतीच्या डी विंगमधील रूम क्रमांक 1203 मध्ये काल रात्रीच्या सुमारास घडली. संबंधित फ्लॅटमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने इमारतीतील रहिवाशांनी सचिवांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर बोळींज पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फ्लॅटची पाहणी केली असता तिघांचे मृतदेह आढळून आले. (Virar News)


बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय- (Virar Crime News)


मृत तिघेही सख्खे भाऊ-बहीण असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी एक जण कर्करोगाने ग्रस्त होता, तर कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या परिस्थितीतून तिघांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय व्यक्त केला जात असला, तरी मृत्यूमागील नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.


फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी- (Virar Crime News)


पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून, याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या घटनेमागील परिस्थितीचा तपास बोळींज पोलीस करत आहेत. दरम्यान, या इमारतीत एका वर्षाच्या कालावधीत आत्महत्येची ही तिसरी घटना असल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी एका माजी लष्करी अधिकाऱ्याने आत्महत्या केली होती. त्यापूर्वी दहावीच्या एका विद्यार्थ्याने इमारतीच्या 14व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.


राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.