Girish Kulkarni on Nana Patekar Deool: 'अगदी शून्य मिनिटात पोहोचतो' , 2011 साली रिलीज झालेल्या 'देऊळ' या सिनेमातील दिवंगत अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा हा डायलॉग. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रचंड गाजला. उमेश कुलकर्णी दिग्दर्शित 'देऊळ' या सिनेमात  नाना पाटेकर (Nana Patekar Death) यांनी 'भाऊ गलांडे' ही भूमिका साकारली होती. नाना पाटेकर यांची  भूमिका  सुपरहिट ठरली.  या सिनेमात अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यांनी 'केश्या' ही भूमिका साकारली होती. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni) यांनी 'देऊळ' (Deool) या सिनेमाबाबत एक किस्सा शेअर केला. गिरीश कुलकर्णी यांना नाना पाटेकर हे 'देऊळ' या सिनेमात हवे होते, असं त्यांनी मुलाखतीत सांगितलं. नेमका किस्सा काय? जाणून घेऊयात.


गिरीश कुलकर्णी यांनी नाना पाटेकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला (Girish Kulkarni Reveals how he convinced Nana Patekar for film)


ज्येष्ठ दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांचं 8 ऑक्टोबर रोजी वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं. त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला. अलिकडेच गिरीश कुलकर्णी यांनी Isapniti Talksला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी नाना पाटेकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच 'देऊळ' या सिनेमाच्या संबंधित एक किस्साही शेअर केला. गिरीश कुलकर्णी म्हणाले की, 'मी त्यांचे नाटक मनापासून पाहिलं आहे. तेव्हा मी कुणीच नव्हतो. माझ्याकडे पैसे नसतानाही त्यांचे नाटक आवर्जून पाहायचो. सिनेमा तर त्यांचे सगळेच पाहिले. माझा अट्टाहास होता की, नाना हे माझ्या पहिल्या सिनेमात असावे. 'वळू' या सिनेमावेळी मी खूप प्रयत्न केला. पण नाना नाही म्हटले'.


''देऊळ' या सिनेमासाठी मला तेच हवे होते. माझा अट्टाहास होता. जवळ जवळ सहा महिने मला त्यांनी तंगवलं.  माझा पण हट्ट होता, नानाच पाहिजे.. मग ते झालं शक्य.  कवितेवर मनापासून प्रेम असलेला माणूस. बहुमुखी अशी व्यक्ती होती. त्यांना बरंच काही माहित होतं. चित्रकला, साहित्य याबद्दल त्यांना ज्ञान होते. थेटपणे सत्य बोलायचे. एखाद्या सत्याकडे आणि एखाद्या अन्यायाकडे अतिशय लक्ष वेधणारं काम, त्यांनी उभं केलं. जे की 'नाम'. कॅमेऱ्यांचा त्यांना अंदाज होता.  नानांची अजून चांगली कामं आम्हाला पाहता आली असती...', असं गिरीश कुलकर्णी म्हणाले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या:


Swapnil Joshi: 'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?'; ट्रिपवरुन घरी परतताच स्वप्नील जोशीच्या लेकरांनी दिलं खास सरप्राईज

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.