आजकाल आपल्याला फसवणुकीचे प्रकार भरपूर पाहायला मिळतात. तुम्ही आता पैसे द्या मी तुमचं काम पूर्ण करून देतो अशी आमिष विक्रेत्याकडून दाखवली जातात. ग्राहक त्यांच्या या बिचारेपणाला भुलून त्यांचं ऐकतात पण नंतर त्यांना त्यांची झाल्याची जाणीव होते. नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमातली अभिनेत्री हेमल इंगळे हिच्या सोबत सुद्धा अशीच घटना घडली. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.







हेमल इंगळे म्हणाली की, माझ्यासोबत कदाचित एक स्कॅम झाला आहे. एक ऑक्टोबर रोजी मी जोगेश्वरी फर्निचर मार्केट मधून एक बेड खरेदी केला. त्याचे ऍडव्हान्स पैसे मी दिले होते. त्यानंतर मी थायलंडला गेले. त्याने पितृपक्ष संपल्यावर साधारण दहा तारखेपर्यंत बेड डिलिव्हर करायचा असं ठरलेलं. मी माझ्या आईला त्या संदर्भातले सगळे रिसीट वगैरे देऊन गेलेले. मी आल्यावर सुद्धा तो बेड आला नव्हता त्यामुळे मी त्या माणसाला फोन केला. तो फोनवर मी दोन दिवसांनी देतो तीन दिवसांनी देतो असं पुढे ढकलत राहिला आणि एक आठवडा काढला. मग मी कंटाळून त्याला फोन केला आणि म्हटलं की काय चालू आहे तुझं? तर तो मला म्हणाला की मॅडम माझं गोडाऊन जळालं.