Tenant vs Society Rules : कंटेंट क्रिएटर्स घर कामाचे ठिकाण असू शकते, पण समजा एखाद्या हाऊसिंग सोसायटी रहिवाशांना स्वतःच्या फ्लॅटमध्ये व्हिडिओ चित्रित करण्यापासून रोखू शकते का? अभिनेत्री आणि टीव्ही रिॲलिटी स्टार उर्फी जावेदने मुंबईतील गृहनिर्माण संस्थेवर आपल्याला राहत्या घरात कंटेंट शूट करण्यापासून रोखल्याचा आरोप केला. चित्रीकरणाचे साहित्य घेऊन येणाऱ्या अभ्यागतांना (व्हिजिटर्सना) गेटवरच अडवण्यात आल्याचाही आरोप केला. पण या वादामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित होतो की, गृहनिर्माण संस्था रहिवाशांना त्यांच्या घरात केल्या जाणाऱ्या कामावर नियंत्रण ठेवू शकतात का?
उर्फी आणि हाऊसिंग सोसायटीमध्ये काय घडले?27 ऑक्टोबर रोजी इन्स्टाग्राम स्टोरीजच्या माध्यमातून उर्फीने सांगितले की, सोसायटी कमिटीने नवीन नियम लागू केला, ज्यानुसार आपल्याला अपार्टमेंटमध्ये कंटेंट शूट करण्यास मनाई केली गेली. हा निर्णय पूर्वी झालेल्या वादाशी संबंधित असल्याचे उर्फीने सांगितले आणि मुंबई पोलिसांकडे तक्रारही केली.
उर्फीने स्वतःला उद्देशून आलेल्या एका नोटीसचा स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यामध्ये आपल्याला हाऊसिंग सोसायटीने राहत्या फ्लॅटमध्ये शूट करण्यास मनाई केल्याचा दावा केला. या निर्बंधाचा सारांश लिहिताना उर्फीने म्हटले आहे की, स्वतःच्या घरात रील्स शूट करणे सोसायटीने बेकायदेशीर घोषित केले.
उर्फी तयार झालेला कंटेंट सोशल मीडियावर अपलोड करते आणि त्यातून लोकप्रियता मिळवते त्यामुळे हाऊसिंग सोसायटीची समिती उर्फीच्या शूटला व्यावसायिक क्रियाकलाप मानते. अशा स्थितीत, इन्स्टाग्राम स्टोरीजच्या एका वेगळ्या मालिकेत उर्फीने कॅमेरा किंवा चित्रीकरणाचे साहित्य बाळगल्याचा संशय असलेल्या अभ्यागतांना आवारात प्रवेश करण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप केला. विशेषतःयूट्यूब क्रिएटर नयनदीपरक्षित आणि त्याच्या टीमला शूटसाठी तिच्याकडे आले असता थांबवले असे सांगितले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिच्या कर्मचाऱ्यांच्या सामानाची तपासणी केल्याचाही आरोप केला.
घरी रील्स शूट करणे बेकायदेशीर आहे का?महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 अंतर्गत घरी इन्स्टाग्राम रील्स शूट करण्यावर कोणतीही सर्वसमावेशक बंदी नाही. पण, हाऊसिंग सोसायट्या नोंदणीकृत बायलॉज आणि इमारतीच्या वापराशी संबंधित नियमांद्वारे अशा प्रकारच्या कामकाजांवर नियम घालू शकतात. फ्लॅटच्या आत व्हिडिओ किंवा कंटेन्ट शूट करणे या नियमांचे उल्लंघन ठरते का? हे त्या कामाचे स्वरूप आणि विशिष्ट निर्बंधांवर अवलंबून असेल.
गृहनिर्माण संस्था तुमच्या पाहुण्यांना थांबवू शकते का?हाऊसिंग सोसायटी आपल्या रहिवाशांचे संरक्षण आणि सुरक्षेचे व्यवस्थापन करण्यासाठी योग्य कार्यपद्धती लागू करू शकतात. सोसायटीत येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची नोंदणी आणि ओळख तपासणी हेही कायदेशीर गरजेचे आहे, पण लक्षात घ्या की केवळ समितीने नियम लागू केले म्हणून आपोआप कायदेशीर ठरत नाही.
येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवरील निर्बंधांची कायदेशीरता त्यांच्या आधार, व्याप्ती आणि अंमलबजावणीवर अवलंबून असते, ज्यामध्ये संस्थेची नियामक कागदपत्रे आणि संबंधित कायद्याचा समावेश आहे. प्रत्येक पाहुण्याला पूर्वपरवानगी गरजेचे करणारा किंवा पुरेशा सबबीशिवाय कायदेशीर अभ्यागतांना रहिवाशापर्यंत पोहोचण्यापासून रोखणारा नियम, संस्था आपल्या अधिकारांचे उल्लंघन करत आहे की नाही याबद्दल प्रश्न निर्माण करू शकतो.
त्याचप्रमाणे, सामानाची तपासणी किंवा शारीरिकरित्या प्रवेशास प्रतिबंध करणे, या गोष्टी परिस्थितीनुसार वेगवेगळे प्रश्न निर्माण करू शकतात.
तुमचं घर ऑफिस कधी बनतं? आपल्या देशातील वाढत्या क्रिएटर इकॉनॉमीबद्दल नक्कीच व्यावहारिक प्रश्न उपस्थित होतो. एखादी व्यक्ती व्हिडिओ बनवून आपला उदरनिर्वाह करत असेल, तर त्यांच्या फ्लॅटमध्ये होणारे सामान्य शूटिंगला सोसायटी व्यावसायिक कृती मानू शकते का?
याचे उत्तर असं देता येणार नाही की कोणत्याही एका पक्षाला अमर्याद नियंत्रण असावे. रहिवाशांनी इमारत वापराच्या नियमांचे पालन केले पाहिजे आणि शेजाऱ्यांना होणारा अवाजवी त्रास टाळला पाहिजे. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांनीही कायद्याच्या चौकटीत आणि बायलॉजनुसार अधिकारांचा वापर केला पाहिजे.
अशाप्रकारे, सोसायटीची नोटीस आणि कायदेशीर आधार स्पष्ट होईपर्यंत उर्फीचे प्रकरण एका निश्चित कायदेशीर निर्णयापेक्षा परस्परविरोधी दाव्यांमधील वाद मानला जाईल. पण यामुळे दरवर्षी अधिक लोकांसमोर येणारा एक ठळक प्रश्न असा आहे की, जेव्हा काम कुठूनही करणं शक्य आहे, अशा काळात एखाद्या व्यक्तीच्या घरात काय घडते, यावर हाऊसिंग सोसायटीचे किती नियंत्रण असले पाहिजे?