नाशिक : मागील काही दिवसांपासून नाशिकमध्ये भोंदूगिरीच्या बऱ्याच घटना उघडकीस येत आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातून संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारं प्रकरण उघडकीस आलं होतं, ते म्हणजे अशोक खरात... इथे भोंदूबाबा अशोक खरातने धार्मिक विधीच्या नावाखाली अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं होतं. त्याने केलेल्या या संपूर्ण कांडांचे काही व्हिडीओ देखील समोर आले होते. यात काही राजकीय नेते देखील अडकल्याची तेव्हा चर्चा झाली. हे प्रकरण मिटत नाही, तोपर्यंत नाशिकमधून भोंदूगिरीची अजून एक घटना समोर आली आहे.




पीडितेचा विनयभंग केलाआता परिसरातून असाच धक्कादायक तथा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. इथे एका भोंदूबाबाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित महिला आरोपीच्या आश्रमात धार्मिक विधी करण्यासाठी आली होती. यावेळी आरोपीनं तिचा गैरफायदा घेतला. सुरुवातीला त्याने पीडितेचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत भोंदूबाबाला अटक केली आहे.







पोलिसांना सतत गुंगारा केलेल्या आरोपीचं नाव आहे. तो मागील काही दिवसांपासून फरार होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला दिंडोरी परिसरात बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.




आश्रमात धार्मिक विधीमिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला येवला येथील दत्तवाडी आश्रमात धार्मिक विधी करण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी उमाकांत खंडेश्वर याने पीडितेचा गैरफायदा घेत, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना घडल्यानंतर पीडित महिलेनं पोलीस तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी खंडेश्वर महाराज पळून गेला होता. मात्र, आता पोलिसांनी संशयित आरोपी उमाकांत खंडेश्वर महाराज याला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी दिली.




Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.