काही महिन्यांपूर्वी संजय गुप्ता यांनी हुसेन झैदी यांना दिलेल्या एका मुलाखतीत 1992 सालचा एक प्रसंग सांगितला होता. त्यावेळी संजय गुप्ता 'आतिश: फील द फायर' या चित्रपटाची शुटिंग करत होते. या चित्रपटात संजय दत्त, करिश्मा कपूर, रवीना टंडन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तेव्हा एक दिवस त्यांच्या घरी फोन आला. फोनवरील व्यक्तीने आपण नाना बोलत असल्याचे सांगितले. संजय गुप्ता यांना नाना म्हणजे कोण हे समजले नाही. नंतर त्यांना समजले की, तो फोन छोटा राजनचा होता. त्यावेळी छोटा राजनने संजय गुप्ता यांना फोनवर प्रचंड शिवीगाळ केली. यामुळे संजय गुप्ता प्रचंड घाबरले. त्यांनी लगेच संजय दत्त याला फोन करुन हा प्रकार सांगितला. तेव्हा संजय दत्त याने आपले वडील सुनील दत्त यांची गाडी पाठवून संजय गुप्ता यांना घरातून सुरक्षितपणे बाहेर काढले होते.
Sanjay Dutt and Sanjay Gupta: संजय दत्तसोबत भांडण, हॉटेलमध्ये काम करण्याचा विचार
संजय गुप्ता आणि संजय दत्त या दोघांनी मिळून 2007 साली व्हाईट फेदर फिल्म्स नावाची प्रॉडक्शन कंपनी सुरु केली होती. 'व्हाईट फेदर फिल्म्स'ने 'शुटआऊट अॅट वडाला' या चित्रपटाची निर्मिती केली होती. मात्र, तंत्रज्ञांच्या मानधनावरुन तेव्हा संजय दत्त आणि संजय गुप्ता यांच्यात भांडण झाले. यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला, त्यांनी एकमेकांशी बोलणे बंद केले. संजय दत्त आणि संजय गुप्ता यांनी एकमेकांशी व्यावसायिक संबंध तोडले. काही लोकांनी दोघांमध्ये गैरसमज निर्माण करुन दिल्याने हा प्रकार घडल्याचे नंतर एका मुलाखतीत संजय गुप्ता यांनी सांगितले.
संजय दत्तसोबत भांडण झाल्यानंतर काहीजणांनी इंडस्ट्रीत अफवा पसरवल्या की, संजय दत्तने गुप्ता यांच्या चित्रपटात काम करु नका, असे सगळ्यांना बजावले आहे. यामुळे जवळपास तीन वर्षे संजय गुप्ता यांच्याकडे कोणतेही काम नव्हते, ते बेरोजगार होते. त्यामुळे एक वेळ अशी आली होती की, संजय गुप्ता हे बॉलीवूड इंडस्ट्री सोडून खंडाळा येथील त्यांचे हॉटेलच चालवावे, या विचारात होते. यानंतर चार वर्षे संजय गुप्ता आणि संजय दत्त यांच्या दुरावा होता. 2012 साली अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत संजय गुप्ता हे जॉन अब्राहम याच्याशी बोलत उभे होते. तेव्हा संजय दत्त याने स्वत:हून गुप्ता यांना आवाज देत हे भांडण संपवले. दोघांनी एकमेकांना मिठी मारली.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.