मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आणि वादात असलेल्या ' महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स ' या चित्रपटाचा एक ट्रेलर समोर आला असून या ट्रेलरची एकच चर्चा सुरू आहे."आता सगळं उघड होणार..." या थरारक टॅगलाइनसह या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. आता या सिनेमाचा एक ट्रेलर समोर आला असून 'चमत्कार को ही नमस्कार करते है लोग, एक हाथ से देव एक हाथ से लेव..! असा डायलॉग या सिनेमात ऐकायला मिळतोय. या ट्रेलरने राजकीय आणि चित्रपट वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.



काय आहे ट्रेलरमध्ये?




ट्रेलरमध्ये सत्ता, अंधश्रद्धा आणि राजकीय हितसंबंधांचे जाळं दाखवण्यात आलं आहे. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत महिलांचं शोषण व फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाचा भांडाफोड या चित्रपटातून करण्यात येणार आहे. या सिनेमात या भोंदू बाबाचं नाव थोरात असं आहे. तर या खरात प्रकरणातील अनेक घटनांशी साधर्म्य असलेले सीन ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. तर खरात आणि खोरात यांच्या लुकमध्येही अगदी साम्य आहे.







चित्रपटात भोंदू अशोक खरात यांची मध्यवर्ती भूमिका ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी साकारत आहेत. तर अभिनेत्री दीपाली सय्यद आणि अभिनेता सुबोध भावे, माधुरी पवार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.