Banking News : लाखोंच्या कर्जाची परतफेड करता येत नसेल तर, बँकेकडून येणाऱ्या फोनला उत्तर न देता पळ काढणे शहाणपण आहे असं तुम्हालाही वाटतं का? समजून घ्या की तुम्ही किंवा तुमच्या जवळची व्यक्ती अशा परिस्थितीत पळ काढण्याचा प्रयत्न करत असेल तर तुमच्या समस्या आणखी वाढू शकतात. सर्वप्रथम समजून घ्या की नाइलाजाने कर्ज न फेडणे हा गुन्हा नाही, त्यामुळे भीतीपोटी कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नका किंवा कर्ज वसुली एजंटांचा उद्धटपणाही सहन करून नका. तुम्ही कर्जाचा हप्ता भरू शकत नसला तरी तुमच्यासमोर अनेक मार्ग खुले राहतात. कर्जाचा हप्ता भरण्यात अडचण येत असेल तर, आपण काय करायचं पाहूया.



बँकेच्या फोन कॉलला उत्तर द्या




एखाद-दुसरा ईएमआय चुकल्यावर बँकेचे फोन टाळल्याने तुमच्या समस्या वाढू शकतात. बँकेच्या फोन कॉलला उत्तर द्या आणि तुमची परिस्थिती समजावून सांगा. कॉल रेकॉर्डिंगची नोंद आणि आवश्यक कागदपत्रे जपून ठेवा.



बँक व्यवस्थापकांना भेटून तुमची समस्या समजवा




बँकेच्या शाखेत जाऊन व्यवस्थापकांना भेटा. नोकरी गेली असेल, व्यवसायात नुकसान किंवा उत्पन्नात घट यांसारखी कारणे लेखी स्वरूपात स्पष्ट करा, ज्यामुळे बँकेला तुमची परिस्थिती समजण्यास आणि उपलब्ध पर्याय सुचवण्यास मदत होईल.



स्थगिती किंवा ईएमआय सुट्टीची मागणी करा




तुम्ही बँकेकडे Moratorium म्हणजेच ईएमआय भरण्यास तात्पुरती स्थगितीची विनंती देखील करू शकता. पण ही सुविधा प्रत्येक ग्राहकाला मिळत नाही तसेच, या कालावधीत व्याज जमा होऊ शकते, ज्यामुळे एकूण देय रक्कम वाढेल.



कर्ज मुदतवाढीचे पर्याय शोधा




तुमचा मासिक EMI खूप जास्त असेल, तर कर्जाची मुदत वाढवण्याबद्दल बँकेशी बोला. यामुळे सिक हप्ता कमी होऊ शकतो, पण जास्त काळ व्याज भरावे लागेल ज्यामुळे एकूण खर्च वाढू शकतो.



अनेक कर्जे एका कर्जात एकत्र करा




तुम्ही एकापेक्षा जास्त कर्जे घेतली असतील तर, कर्ज एकत्रीकरण म्हणजे मर्जचा विचार करा. यामध्ये वेगवेगळी कर्जे एकत्र करून एकच कर्ज बनवले जाते पण, प्रक्रिया शुल्क आणि व्याजदरांची तुलना नक्की करा.



कमी व्याजदराच्या कर्जाने महागडे कर्ज फेडा




24% व्याजदराचे वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड कर्ज फेडण्यासाठी कमी व्याजदर असलेल्या गोल्ड लोनचा विचार करा. पण सोन्याची सुरक्षितता आणि तुमची परतफेड करण्याची क्षमता लक्षात ठेवा.



वसुली एजंटच्या गैरवर्तनाबद्दल तक्रार करा




वसुली एजंट तुमच्या घरी येऊन धमकी देत ​​असेल किंवा उद्धटपणे वागत असल्यास बँकेच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे तक्रार करा. याशिवाय शक्य असल्यास पुरावा म्हणून कॉल रेकॉर्डिंग, मेसेज किंवा व्हिडिओ जतन करून ठेवा. बँकेने 30 दिवसांत कारवाई केली नाही किंवा प्रतिसाद दिला नाही, तर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या CMS पोर्टलवर तक्रार दाखल करू शकता.



वसुली एजंटच्या कधी कॉल करू शकतो?




रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार थकीत कर्ज वसूलसाठी वसुली एजंट सकाळी 8 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 7 वाजल्यानंतर कॉल करू शकत नाही. तसेच त्यांना कोणत्याही व्यक्तीला धमकी किंवा त्रास देण्याची परवानगी देखील नाही.



लोन सेटलमेंट शेवटचा पर्याय




शेवटी तुमच्याकडे दुसरा कोणताही दुसरा पर्याय राहिला नाही तर, लोन सेटलमेंटचा विचार करा. याअंतर्गत बँक थकीत रकमेपेक्षा कमी रक्कम स्वीकारू शकते पण, तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर खात्याची स्टेटस Settled अशी नोंदवली जाऊ शकते, ज्यामुळे भविष्यात कर्ज मिळवणे कठीण होऊ शकते.



सेटलमेंटनंतर कागदपत्रे मिळवण्याची खात्री करा




तुम्ही बँकेसोबत तडजोड किंवा सेटलमेंट केले, तर बँकेकडून पेमेंटची पावती, लेखी सेटलमेंट पत्र आणि NOC मिळवण्याची खात्री करा. तसेच क्रेडिट रिपोर्टमधील माहिती तपासा आणि लक्षात ठेवा की सेटलमेंटनंतर मिळालेली NOC ही संपूर्ण कर्ज फेडल्यावर मिळालेल्या क्लोजर सर्टिफिकेटपेक्षा वेगळी असू शकते.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.