सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारच्या 'सेफ फूड सेफ महाराष्ट्र' या मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी गाढे जळगाव येथील 'मेसर्स ५ स्टार मसाले' कंपनीवर छापा टाकत प्रशासनाने तब्बल १६ लाख ४० हजार ९०० रुपये किमतीचा २,८०२ किलोग्रॅम भेसळयुक्त अन्नाचा साठा जप्त केला आहे. तसेच या आस्थापनेचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.




कारखान्यावर धाड वतीने मिळालेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. कुचेकर यांच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गाढे जळगाव (गट क्र. २९९/पी) येथील कारखान्यावर ही धाड टाकली. अन्न सुरक्षा कायद्यातील कलम ३(१)(zx), २६(२)(ii), २७(१) आणि कलम ५१ च्या उल्लंघनाखाली ही जप्तीची कारवाई करण्यात आली.







भविष्यातही अशीच कडक कारवाईचा इशाराकारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला सर्व साठा रीतसर सीलबंद करण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत हा साठा कारखान्याचे एफबीओ यांच्या ताब्यात सुरक्षेसाठी देण्यात आला असून, या साठ्याशी कोणतीही छेडछाड न करण्याचे सक्त निर्देश प्रशासनाने दिले आहेत. या कारवाईच्या वेळी संतोष मारुती भुते (रा. हर्सूल) हे पंच म्हणून उपस्थित होते. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा अन्नपदार्थ उत्पादकांवर अन्न व औषध प्रशासनाकडून भविष्यातही अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा एफडीएचे सह आयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.




जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालमटण मसाला : ७९८ किलोग्रॅम (१६ युनिट्स) – किंमत रु. ५,१८,७००




मिरची पावडर : ९१८ किलोग्रॅम (२३ युनिट्स) – किंमत रु. ४,५९,०००




हळद पावडर : ४८८ किलोग्रॅम (१४ युनिट्स) – किंमत रु. २,४४,०००




धने पावडर : ५९८ किलोग्रॅम (१२ युनिट्स) – किंमत रु. २,३९,२००




एकूण जप्त साठा : २,८०२ किलोग्रॅम - एकूण किंमत: रु. १६,४०,९००







एफडीएचे चार अधिकारी निलंबितप्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांवरील कारवाईदरम्यान प्रशासकीय अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत राज्य सरकारने अन्न व औषध प्रशासनातील ( एफडीए ) चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. ठाण्यातील हाय स्ट्रीट इम्पेक्स आणि पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सोएक्स इंडिया या दोन कंपन्यांशी संबंधित प्रकरणांत ही कारवाई करण्यात आली आहे.




या दोन्ही कंपन्यांवरील कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांची भूमिका, कायदेशीर अधिकारक्षेत्र आणि प्रशासकीय प्रक्रियेतील कथित अनियमितता यांची चौकशी करण्यात आली होती. ‘एफडीए’चे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या माध्यमातून ही चौकशी करण्यात आली. त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी जारी आदेशानुसार अन्न सहआयुक्त दिगंबर भोगावडे, अन्न सहायक आयुक्त यदुराज दहातोंडे आणि अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलागेर व सी. आर. स्वामी या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.




Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.