हॅमिल्टन : न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी २० आय मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्याचं आयोजन हे हॅमिल्टनमधील सेडन पार्कमध्ये करण्यात आलं आहे. श्रेयस अय्यर याच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर मिचेल सँटनर न्यूझीलंडचं कर्णधारपद सांभाळणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी १२ वाजता टॉस झाला. न्यूझीलंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार मिचेल सँटनर याने टॉस जिंकून फिल्डींगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अखेर क्रिकेट चाहत्यांना या मालिकेत पहिल्यांदाच पहिल्या डावात भारताची बॅटिंग पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे भारतीय फलंदाज किती धावांपर्यंत मजल मारतात? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.




कोण जिंकणार अंतिम सामना? यांच्यातील टी २०आय मालिकेचा निकाल हा तिसऱ्याच सामन्यात लागला. भारताने या ५ सामन्यांच्या मालिकेत विजयी हॅटट्रिक पूर्ण करत मालिका आपल्या नावावर केली. तर न्यूझीलंडने चौथ्या सामन्यात विजयाचं खातं उघडलं. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेत ३-१ ने आघाडीवर आहे. कोणता संघ विजयाने मालिकेचा शेवट करणार? याकडेच क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.




सेडन पार्कमधील उभयसंघातील तिसरा सामनान्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यात सेडन पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेला हा तिसरा टी २०आय सामना आहे. याआधी झालेल्या २ सामन्यात दोन्ही संघांची कामगिरी ही बरोबरीची राहिली आहे. न्यूझीलंड आणि टीम इंडियाने प्रत्येकी १ सामना जिंकला आहे. त्यामुळे आता या मैदानातील तिसरा सामना कोणता संघ जिंकतो? यासाठी निकालापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.




ग्लेन फिलीप्सला वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधीन्यूझीलंडचा विस्फोटक फलंदाज ग्लेन फिलीप्स याला अंतिम सामन्यात इंग्लंडच्या फिल सॉल्ट याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. फिल सॉल्ट याच्या नावावर ५ सामन्यांच्या टी २० आय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. ग्लेनला सॉल्टचा हा विक्रम मोडीत काढण्यासाठी फक्त ५६ धावांची गरज आहे.




फिल सॉल्ट याने ५ सामन्यांच्या टी२० आय मालिकेत सर्वाधिक ३३१ धावा केल्या आहेत. तर ग्लेन फिलीप्स याने टीम इंडिया विरुद्ध २ अर्धशतक आणि १ शतकाच्या मदतीने एकूण २७६ धावा केल्या आहेत. त्यामुळे ग्लेन फिल सॉल्ट याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्यात यशस्वी ठरणार की भारतीय गोलंदाज त्याला रोखणार? याची प्रतिक्षा चाहत्यांना आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.