मुंबई: मुंबई परिसरात सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई महानगर प्रदेशात रविवारपासून सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आल्याने रिक्षा टॅक्सी संघटनांकडून तीव्र विरोध केला जात आहे. सीएनजीचे दर वाढल्याने त्याचा परिणाम हा रोजच्या कमाईवर होत असल्याचे त्यांचे मत आहे. सीएनजीमध्ये करण्यात आलेली दरवाढ प्रति किलो एक रुपयाची नवी वाढ आहे.




१ ऑक्टोबरला दरवाढ करण्यात आली होतीएप्रिलपासून होणारी ही सहावी दरवाढ आहे. सीएनजीचा किरकोळ दर ८९ रुपये प्रति किलोवरून ९० रपये प्रति किलो झाला आहे. यापूर्वी झालेली दरवाढ पाहता १ सप्टेंबर रोजी रिक्षा भाडे २६ रुपयावरून २७ रुपये करण्यात आले होते.त्यावेळी २ किलोची प्रति दरवाढ ही सीएनजीमध्ये लागू करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एक रुपयाची दरवाढ ही १ ऑक्टोबरला करण्यात आली होती.




अतिरिक्त भार ऑटोरिक्षा चालकांवरयावर मुंबई रिक्षाचालक संघटनेचे नेते थम्पी कुरीयन म्हणाले की या सततटच्या होणाऱ्या दरवाढीला रिक्षाचालक संघटनांचा विरोध आहे. हा सततचा वाढता इंधन खर्च भाडेवाढ करून देखील ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांना नफ्याचा फायदा होऊ देत नाही.याचा अतिरिक्त भार हा चालकांवर पडत असल्याचे त्यांनी म्हंटले




मध्य पूर्वेतील ताणावएमजीएलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आंतरराष्ट्रीय बाजाराचा अभ्यास करता,मध्य पू्र्वेतील ताणावपूर्ण परिस्थितीमुळे गॅसचे दर बाजारात वाढले आहेत. परिणामी देशात निर्मित होणारे गॅस आणि परदेशात निर्मित होणारे गॅस या दोन्हींच्या किमतीत वाढ झाली आहे. खर्च वाढले आहेत. त्यामुळेच गॅसच्या दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.




सीएनजी दरवाढ वरचेवरगॅस आयातीच्या देखील यावर झाल्याचे दिसून येत आहे. देशात सरकारकडून होणारा गॅसचा पुरवठा घटल्याने एमजीएलला सीएनजीची गरज भागवण्यासाठी परदेशातून महागड्या दराने गॅस खरेदी करावा लागतो आहे. त्यामुळेच सीएनजी दरवाढ वरचेवर होत आहे.




शहरात ४.७ लाख ऑटोरिक्षाशहरात सीएनजीचा वापर करणारी वाहने ही ४.७ लाख ऑटोरिक्षा, १.६ लाख टॅक्सी आणि ५ लाखांहून अधिक खाजगी गाड्यांचा समावेश आहे. त्यासोबतच इतर बस आणि वाहनांचा समावेश देखील आहे.त्यामुळे सीएनजीचा वापर अधिक असल्याने पुरवठा देखील त्याच प्रमाणात करावा लागतो आहे.







सीएनजी पुरवठ्याचा उद्देशएमजीएल च्या मतानुसार करण्यात आलेली दरवाढ ही विचारपूर्वक करण्यात आली आहे. सीएनजी खेरदीसाठी लागणारा खर्च आणि सीएनजी पुरवठा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला.




Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.