Investment Strategy : दिवाळीनिमित्त तुम्हाला एक लाख रुपयांची एकरकमी रक्कम मिळाली असेल आणि तुम्हाला फक्त एका वर्षासाठी सुरक्षित गुंतवायची असेल, तर योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे. सरकारद्वारे हमी मिळणाऱ्या पोस्टाच्या अनेक योजना सध्या बँकेतील गुंतवणुकीपेक्षा जास्त व्याजदर देत असून त्यापैकी काही दीर्घकालीन ऑप्शन आहेत. पोस्टाची एक वर्षीय टाइम डिपॉझिट योजना एक वर्षाच्या मुदतीसाठी सर्वात योग्य असून या स्कीममध्ये 6.9% वार्षिक दराने व्याज मिळतो, म्हणजे तुम्हाला बचत खात्यापेक्षा अंदाजे 3,000 अधिक मिळतील.
दिवाळी बोनसचा पैसा कुठं गुंतवायचातुम्हाला 1 लाखांचा दिवाळी बोनस मिळाला असेल आणि फक्त एका वर्षासाठी गुंतवायचा असेल, तर पोस्टाच्या योजनांमधून योग्य पर्याय निवडा. पोस्टातील अनेक योजना दीर्घकालावधीसाठी आहेत त्यामुळे, केवळ जास्त व्याजदराच्या आधारावर निवड करणे शहाणपण नाही.
पोस्टाच्या योजनांवरील सध्याचा व्याजदरऑक्टोबर-डिसेंबर 2026 या तिमाहीसाठी सरकारने छोट्या बचत योजनांवरील व्याजदर ‘जैसे थे’ ठेवला आहे. म्हणजे जुलै-सप्टेंबरचे दर 31 डिसेंबर 2026 पर्यंत लागू राहतील. पोस्ट ऑफिस एक वर्षाच्या मुदत ठेवीवर 6.9% वार्षिक व्याजदर मिळत आहे.
एक लाखावर किती व्याज मिळेल? पोस्टाच्या अधिकृत आकडेवारीनुसार एक वर्षाच्या टाइम डिपॉझिटवर प्रत्येक 10,000 रुपयांवर वार्षिक अंदाजे 708 रुपये व्याज मिळते आणि व्याजाचे कॅलक्युलेशन तिमाही आधारावर केले जाते. त्यामुळे, 1 लाखावर वार्षिक अंदाजे 7,080 रुपयांचा व्याज मिळेल आणि यासह मॅच्युरिटीनंतर तुमची एकूण गुंतवणूक 1,07,080 रुपये होईल.
लक्षात घ्या की पोस्टाच्या बचत खात्यावर 4% व्याज मिळत आहे, म्हणजे 1 लाखावर वार्षिक अंदाजे 4,000 मिळतील तर, मुदत ठेवीवर अंदाजे 3,000 अधिक फायदा होईल. त्याचवेळी, काही योजनांमध्ये जास्त व्याजदर मिळतात, पण त्यांचा कालावधीही जास्त असतो त्यामुळे केवळ एका वर्षासाठी पैसे गुंतवायचे असतील तर तुमच्यासाठी यापैकी कोणतीही योजना फायद्याची नाही.
अशा परिस्थितीत, तुम्हाला तुम्हाला एका वर्षात पैशांची गरज पडणार असेल तर एक वर्षाच्या एफडी सर्वात सोपा पर्याय आहे. पण तुम्हाला दीर्घकाळ पैसा होल्ड करून ठेवायचा असल्यास तुम्ही तुमचे वय आणि गरजांनुसार दीर्घ मुदतीच्या योजनांचा विचार करू शकता. पोस्टाच्या अल्पबचत योजनांवरील व्याजदरांचा प्रत्येक तिमाहीत सुधारित केला जातो त्यामुळे, खाते उघडण्यापूर्वी पोस्ट ऑफिसमध्ये सध्याचा दर तपासा.
पोस्टाची टाइम डिपॉझिटसह सुकन्या समृद्धी (8.2%), SCSS (8.2%), किंवा पीपीएफ (7.1%) यांसारख्या योजना जास्त व्याजदर देतात, पण या योजनांचा लॉक-इन कालावधी 5 ते 21 वर्षांपर्यंत असतो. त्यामुळे, दीर्घकालीन योजनांमधून मुदतपूर्व विड्रॉल केल्यास दंड टाळण्यासाठी एक वर्षाची मुदत ठेव निवडा.