Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यात एकीकडे दुष्काळाची भीषण दाहकता दिवसागणिक तीव्र होत असताना वातावरणातही मोठा बदल (Maharashtra Weather Updates) होताना दिसत आहे. राज्यातल्या काही भागात धो धो पाऊस कोसळतोय. पुणे, सातारा, रत्नागिरी, अहिल्यानगर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील विविध भागांत पिकांचे संमिश्र परिणाम दिसून आले. याचदरम्यान, हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.एस.डी. सानप यांनी एबीपी माझाशी बोलताना महत्वाची माहिती सांगितली. (Maharashtra Rain)
राज्यातील अनेक ठिकाणी सुरु असलेला हा परतीचा पाऊस नाही. पाऊस आणि परतीचा पाऊस ऑक्टोबरच्या 20 तारखेपर्यंतच होता. 'मुरासू' नावाचे चक्रीवादळ (Murasu Cyclone) निर्माण झाले आहे. याच्या प्रभावामुळे तापमानात वाढ झाली आहे आणि त्यामुळे असा पाऊस होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस.डी. सानप यांनी दिली. (Murasu Cyclone Marathi News)
पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, कोकण किनारपट्टीवरील काही जिल्हे, तसेच सातारा आणि कोल्हापूरमध्ये पाऊस पडला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांत मात्र हवामान कोरडे राहिले आहे.'मुरासू' नावाचे चक्रीवादळ (Cyclone) निर्माण झाले आहे. याच्या प्रभावामुळे तापमानात वाढ झाली आहे. वातावरणाच्या वरच्या स्तरात, साधारण 5 ते 10 किलोमीटर उंचीवर सबट्रॉपिकल वेस्टर्ली रिजचा म्हणजेच वातावरणाच्या वरच्या थरात प्रभाव असल्यामुळे प्रामुख्याने काही भागात पाऊस कोसळत असल्याचं हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी सांगितले.
राज्यात एकीकडे दुष्काळी परिस्थिती असताना पुणे शहरात अवकाळी पाऊस सुरू आहे.. पुणे शहरात कालपासून अवकाळी पावसाचा जोर कायम आहे... पुण्यातील कर्वे रोड,चांदणी चौक, बालेवाडी, बारामती, ताथवडे, मुळशी या परिसरात पावसाची जोरात बॅटिंग सुरू आहे सिंहगड रोड परिसरासह हडपसर, स्वारगेट, कोथरूड आणि शिवाजीनगर या प्रमुख भागांमध्ये काल रात्री जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, विशेषतः रात्रीच्या वेळी बाहेर असलेल्यांना अडचणींचा सामना करावा लागला.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.