Helicopter Accident : नेपाळच्या सोलुखुंबू जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टच्या बर्फाच्छादित प्रदेशात एक भीषण अपघात घडला आहे. लँडिंग दरम्यान, दोन हेलिकॉप्टरची जोरदार धडक झाली आहे. या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान, या दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये किती प्रवासी होते याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही.
ही घटना सोलुखुंबू जिल्ह्यातील उंच, बर्फाच्छादित भागात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये पर्यटक आणि स्थानिक प्रवासी होते. बर्फाच्छादित टेकड्यांमध्ये एक हेलिकॉप्टर उतरण्याचा प्रयत्न करत असताना, हवेच्या दाबामुळे किंवा तोल गेल्याने तेथे आधीच असलेल्या दुसऱ्या हेलिकॉप्टरला त्याची धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की हेलिकॉप्टरचे रोटर ब्लेड्स आणि पंखे तुटले, आणि बर्फाचा ढग सर्वत्र उडाला. घटनास्थळी उपस्थित असलेले लोक जीव वाचवण्यासाठी पळू लागले.
एक और बहाना मौत का...नेपाल में दो हेलिकॉप्टर लैंडिंग के वक्त आपस में टकरा गए जिसमें एक भारतीय पर्यटक की मौत हो गई. https://t.co/GcVHYpkHs5
— आजाद भारत का आजाद नागरिक (@AnathNagrik) November 3, 2026
नेपाळ पोलीस आणि स्थानिक बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचाव व मदतकार्य सुरू केले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या धडकेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. नेपाळच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये अपघाताची नेमकी घटना कसी घडली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, लँडिंग दरम्यान, दोन हेलिकॉप्टरची जोरदार धडक झाली आहे. या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.
दरम्यान, या दोन हेलिकॉप्टरच्या भीषण अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेपाळमधील या दुर्गम आणि धोकादायक हवाईपट्टी क्षेत्रातील विमानांच्या सुरक्षिततेबद्दल लोक चिंता व्यक्त करत आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.