ईडन पार्क : न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेची सुरुवात ४ नोव्हेंबरपासून होणार आहे. दोन्ही संघांनी या मालिकेसाठी जोरदार तयारी केली आहे. उभयसंघातील हा सामना ईडन पार्कमध्ये खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी यजमान न्यूझीलंडला मोठा झटका लागला आहे. न्यूझीलंडच्या अनुभवी आणि सलामीवीर फलंदाजाला पहिल्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसंच या फलंदाजाऐवजी आता कुणाला खेळवण्यात येणार याबाबत कर्णधाराने स्पष्ट संकेत दिले आहेत.




न्यूझीलंडचा विकेटकीपर बॅट्समन याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. त्याच्या जागी टीम सायफर्टला संधी देण्यात येणार आहे. डेव्हॉनला सरावादरम्यान दुखापत झाल्याने सलामीच्या सामन्याला मुकावं लागलं आहे. डेव्हॉन आणि सहकारी दोघेही सराव दरम्यान एकमेकांना धडकले. डेव्हॉन आणि मॅट हेन्री या दोघांची धडक झाली. या धडकेमुळे डेव्हॉनला पहिल्या सामन्यात खेळता येणार नाहीय. तसंच डेव्हॉन आता ठीक आहे, अशी माहिती न्यूझीलंड आणि आयसीसीकडून देण्यात आली.




नक्की काय झालं?डेव्हॉन आणि मॅट हेन्री हे दोघे कॅचचा सराव करत होते. दोघेही कॅचसाठी प्रयत्न करत होते. या दरम्यान दोघेही एकमेकांना धडकले. दोघांची ही धडक पाहून एकच खळबळ उडाली. वैद्यकीय पथकाने दोघांची पाहणी केली.




कर्णधार मिचेल सँटनरची प्रतिक्रिया''मॅट हेन्री याची कन्कशन टेस्ट करण्यात आली, तो ठीक आहे असं वाटतंय. मात्र डेव्हॉनला आणखी काही टेस्टसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. दोघांची झालेली धडक पाहून बरं वाटलं नाही'', असं मिचेल सँटनर म्हणाला. तसंच डेव्हॉनच्या जागी टीममध्ये कोण खेळणार? याबाबतही सँटनरने माहिती दिली.



डेव्हॉन कॉनव्हे आऊट




''डेव्हॉन बाहेर झाल्याने प्लेइंग ईलेव्हनमध्ये टीम सायफर्टला संधी देण्यात येणार असल्याचे संकेत सँटनरने दिले. ''तो (डेव्हॉन) आमचा बॅकअप बॅट्समन आहे. त्यामुळे डेव्हॉन उपलब्ध नसल्यास त्याच्या जागी थेट बदल होईल'', असं सँटनर म्हणाला.




''संघात बदल करणं दुर्देवी आहे. टीम सायफर्ट एकदिवसीय क्रिकेटमधील चांगला खेळाडू आहे. सायफर्ट टी २०आय क्रिकेटमध्ये संधीची प्रतिक्षा करत होता'', असं सँटनरने पत्रकार परिषदेत नमूद केलं.



पहिल्या वनडेसाठी न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), टॉम लॅथम (विकेटकीपर), हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरेल मिचेल, ग्लेन फिलीप्स, मायकल ब्रेसवेल, मॅट हेन्री, जेकब डफी, नॅथन स्मिथ, मॅथ्यू फिशर, ब्लेअर टीकनर, टीम सायफर्ट आणि कायल जेमीसन.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.