मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई सुरु आहे. अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.  गेल्या दोन दिवसात 45 लाख रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. 5 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 3 एफ.आय.आर. दाखल झाले आहेत. तर 2 जणांना अटक तर 2 वाहने जप्त करण्यात आली असून 2 आस्थापना सील करण्यात आली आहे. 


दिनांक 1 ते 3 नोव्हेंबर 2026 दरम्यान राज्यभर विशेष तपासणी मोहीमः प्रतिबंधित अन्नपदार्थांसह एकूण 45 लाखांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. कोकण व नाशिक विभागात प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. 11.55 लाखांचा प्रतिबंधित साठा व 2 वाहने जप्त; 3 एफ.आय.आर. दाखल, 2 जणांना अटक, २ आस्थापना सील करण्यात आली आहे. चेंबूर, मुंबई येथे लक्झरी बसमधून अस्वच्छ परिस्थितीत वाहतूक होणारा 11.11 लाख किमतीचा 1 हजार 2 किलो स्वीट हलवा व मिठाईचा साठा जप्त करण्यात आला आहे. 


सात विभागांत मिठाई, खवा, फरसाण, खाद्यतेल, सुका मेवा आदी 22.34 लाख किमतीचा अन्नसाठा जप्त केला आहे. हॉटेल्स, मिठाई दुकाने व उत्पादक आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. 5 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर 1 आस्थापनेस व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस देण्यात आली आहे, सणासुदीच्या कालावधीत नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक व वितरण रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत दिनांक 1 नोव्हेंबर 2026 ते 3 नोव्हेंबर 2026 या कालावधीत राज्यभर विशेष तपासणी व धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली. यामध्ये कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर विभागातील कारवाईचा समावेश आहे.


दिवाळीच्या तोंडावर ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; 85 लाखांचा मुद्देमाल जप्त, 10 जण अटकेत


दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दारूची वाढती मागणी लक्षात घेऊन ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. तस्करांचे मनसुबे उधळून लावत विभागाने विविध ठिकाणी छापे टाकत तब्बल 85 लाख रुपयांचा अवैध मद्य आणि परराज्यातील कर चुकवलेला मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली असून 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सणासुदीच्या काळात ग्राहकांची फसवणूक होऊ नये आणि आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून उत्पादन शुल्क विभागाचे पथक अधिक सतर्क झाले असून, नागरिकांनी अनधिकृत ठिकाणांवरून स्वस्त दरात मिळणारे मद्य खरेदी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.