प्रसाद रानडे,रत्नागिरी:कोकण रेल्वे मार्गावर काही गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून कोकण रेल्वे मार्गावरची महत्त्वाची असलेली मांडवी एक्सप्रेस तब्बल पाच तासाने बुधवारी उशिरा धावत होती. मांडवी एक्सप्रेसला गेले काही दिवस रोजच लेटमार्क मिळत आहे. याचा फटका पाठोपाठ सुटणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसला ही बसला आहे.




प्रवाशांच्या वेळेची किंमत प्रशासनाला नाही का?त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले मात्र याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही. मुंबईतून सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी सुटणारी ही मांडवी एक्सप्रेस आज मात्र तब्बल पाच तास उशिरा आली सुटली. दुपारी 12.15 वाजता सुटणार असल्याचे रेल्वे कळविण्यात आले त्यामुळे पुढच्या प्रवासाला प्रवाशांना मोठा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रवाशांच्या वेळेची किंमत प्रशासनाला नाही का? असा खडा सवाल आता उपस्थित होत आहे.




10103 या क्रमांकाची मांडवी एक्सप्रेस रोजच उशिराकोकण रेल्वे मार्गावर सुटणारी 10103 या क्रमांकाची मांडवी एक्सप्रेस रोजच उशिराने सुटत आहे. १ नोव्हेंबर २०२६ची गाडी सकाळी 7.10 ऐवजी सुटली ९ वाजता सुटली होती. मांडवी पाठोपाठ कोकणकन्या (20111) एक्सप्रेसलाही विलंबाचा फटका बसला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या या लोकप्रिय गाड्या आहेत. मात्र या दोन्ही एक्सप्रेस उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.




कोकण रेल्वे प्रवाशांसाठी सुखदवार्तादरम्यान कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एका गाडीचा सुपरफास्ट एक्सप्रेस असलेला दर्जा रद्द करण्यात आला आहे. या वर्गावरून धाव लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान धावणाऱ्या वातानुकूलित एक्सप्रेसच गाडी क्रमांक 22115/22116 या दोन्ही गाड्यांना असलेला 'सुपरफास्ट' दर्जा रद्द करण्यात आला आहे. त्या साध्या एक्स्प्रेस म्हणून धावणार आहेत. या गाडीच्या दर्जामध्ये केलेल्या बदल नवीन वर्षात म्हणजेच एक जानेवारी 2027 पासून लागू होणार आहे. दर्जा बदलल्यामुळे या गाडीचे क्रमांकही बदलणार आहेत.




११०५३ व ११०५४ असे नॉर्मल एक्सप्रेस गाडीचे क्रमांक असणार आहेत. सुपरफास्ट एक्सप्रेस ही दर्जा बदलण्यात आलेली गाडी मुंबई ते गोव्यादरम्यान आठवड्यातून एकदा धावते मात्र आता सुपरफास्ट एक्सप्रेस हा दर्जा काढण्यात आल्याने या गाडीला कोकणरेल्वे मार्गावरती जास्तीचे थांबे (हाॅल्ट) मिळू शकतात त्यामुळे प्रवाशांच्या फायदा होणार आहे.




'वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस' करणाऱ्या पर्यटक प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणारी आलिशान असलेली व सगळ्यांनीच पसंती दिलेली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेली प्रतिष्ठेची असलेली 'वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस' या गाडीला ही आता दुप्पट डबे मिळणार आहेत. या आधी आठ डब्यांची असलेली एक्सप्रेस तब्बल 16 डब्यांची करण्यात आली आहे.







आरक्षण कन्फर्म होण्याची शक्यताहा बदल इथे 10 नोव्हेंबर पासून लागू होणार आहे. डबे वाढवण्यात आल्याने प्रवासी पर्यटकांना या दिवाळीच्या सुट्टीत याचा लाभ मिळणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आरक्षण नेहमीच हाउसफुल्ल असते मात्र आता डबे वाढल्याने स्वाभाविकपणे असं क्रमांक वाढले आहेत. त्यामुळे वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस मधून प्रवास करण्यासाठी केलेल आरक्षण कन्फर्म होण्याची शक्यता वाढली आहे.




Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.