बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






पनवेल पालिकेच्या आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गदारोळ झाला. प्रेक्षक गॅलरीत नागरिकांनी टाळ्या वाजवल्याने त्यांना बाहेर काढण्याचे आदेश महापौर नितीन पाटील यांनी दिले. मात्र नागरिकांना बाहेर काढू नये, अशी भूमिका घेणारे शेकापचे नगरसेवक प्रकाश म्हात्रे यांच्यावरच महापौरांनी एका सभेसाठी निलंबनाची कारवाई केली. भाजपच्या महापौरांना टाळीची अ‍ॅलर्जी आहे का, असा सवाल करत महापौरांच्या दंडेलीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी सभात्याग केला.


गव्हाण आणि वडघर जिल्हा परिषद गटांचा पनवेल पालिकेत समावेश करण्याच्या प्रस्तावावर सभागृहात चर्चा सुरू होती. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगरसेविका लीना गरड यांनी प्रशासनाच्या कामकाजातील उणिवा सभागृहासमोर मांडल्या. त्यांच्या भाषणाला प्रेक्षक गॅलरीत उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. प्रेक्षक गॅलरीतून टाळ्यांचा आवाज येताच महापौर नितीन पाटील भडकले. त्यांनी संबंधित नागरिकांना गॅलरीबाहेर काढण्याच्या सूचना सुरक्षारक्षकांना दिल्या. यावर नगरसेवक प्रकाश म्हात्रे यांनी नागरिकांना गॅलरीतच बसू देण्याची विनंती महापौरांकडे केली. मात्र महापौरांनी या विनंतीला मान्यता न देता उलट म्हात्रे यांनाच निलंबित केले.


नितीन पाटील यांची ताठर भूमिका


नागरिकांनी टाळ्या वाजवल्याच्या घटनेवरून नगरसेवक प्रकाश म्हात्रे यांच्यावर कारवाई झाल्याने विरोधी सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरसेवक केतन भगत आणि लतिफ शेख यांनीही महापौर नितीन पाटील यांना निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. मात्र महापौरांनी आपली ताठर भूमिका कायम ठेवली.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.