वॉशिंग्टन: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाला जबर धक्का बसला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये डेमोक्रॅटला बहुमत मिळालं आहे. जगाचं लक्ष लागलेल्या मिशिगन मतदारसंघातून अब्दुल अल-सय्यद यांनी बाजी मारली. ते अमेरिकेच्या सिनेटमध्ये पोहोचणारे पहिले मुस्लिम ठरले आहेत. त्यांनी मिशिगन मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार माईक रोजर्स यांचा दारुण पराभव केला.






अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात अब्दुल अल-सय्यद यांच्यावर विखारी टीका केली होती. ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचारात अब्दुल यांना जिहादी, हमास समर्थक आणि मुस्लिम ब्रदरहूड समर्थक म्हटलं होतं. अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये आतापर्यंत मुस्लिम प्रतिनिधी निवडून गेले आहेत. पण संसदेचं वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटमध्ये आजपर्यंत एकही एकही मुस्लिम नेता पोहोचलेला नाही. त्यामुळे अब्दुल अल-सय्यद यांचा विजय ऐतिहासिक मानला जात आहे.






मिशिगनमधून अब्दुल अल-सय्यद यांनी विजय मिळवला. इजिप्तशियन वंशाच्या अब्दुल अल-सय्यद यांनी रिपब्लिकन पक्षाच्या माईक रोजर्स यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. दोघांमध्ये अटीतटीचा सामना झाला. अब्दुल अल-सय्यद यांना २४ लाख ३१ हजार ११२ मतं मिळाली. त्यांनी एकूण ५२.३१ टक्के मतं घेतली. तर रॉजर्स यांना २१ लाख २३ हजार ५२२ मतं मिळाली. रॉजर्स यांनी ४५.६९ टक्के मतांवर समाधान मानावं लागलं.






४२ वर्षीय अल-सय्यद पेशानं डॉक्टर आहेत. ते सातत्यानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या रडारवर राहिले आहेत. अब्दुल अल सय्यद याआधी आग्नेय मिशिगनच्या डेट्रॉईट आणि वेन काऊंटीमध्ये आरोग्य विभागाचं नेतृत्व केलं आहे. यावेळी त्यांनी निवडणूक जिंकत अमेरिकेचे पहिले मुस्लिम सिनेटर होण्याचा मान पटकावला.






सय्यद यांच्या समोर निवडणूक लढवलेले रॉजर्स अमेरिकन संसदेचे माजी सदस्य राहिले आहेत. ते राज्याच्या विधानसभेचेही माजी सदस्य आहेत. त्यांनी २०२४ मध्येही सिनेटची निवडणूक लढवली होती. पण डेमोक्रॅटच्या सिनेटर एलिसा स्लॉटकिन यांनी त्यांचा पराभव केला. रॉजर्स यांचा समावेश ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांमध्ये होतो. त्यांनी इराण विरोधातील युद्ध, कर कपात आणि देशांतर्गत ऊर्जा उत्पादन वाढवण्याचं समर्थन केलं होतं.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.