मुंबई : महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे राज्यभरात दिवाळीचा उत्साह आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला राज्यभरात बाजारपेठांमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. या सगळ्या गडबडीत अनेक जण नो एन्ट्री असणाऱ्या रस्त्यांमध्ये आपली गाडी घेऊन जातात. फक्त दिवाळीतच नाही तर ऐरव्ही देखील अनेक जण नो एन्ट्रीमधून गाडी चालवतात. तसेच अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे वाहतुकीचे नियमभंग करतात. त्यामुळे त्यांच्या वाहनांना दंड आकारला जातो. पण हा दंड नेमका कसा भरायचा, तसेच किती दंड भरावा लागेल, याबाबत अनेकांच्या मनात भीती देखील असते. पण अशा नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. राज्य सरकारने अशा नागरिकांसाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.




राज्य मंत्रिमंडळाची आज मुंबईतील मंत्रालयात अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह जवळपास सर्वच खात्याचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत तब्बल 12 निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी एक निर्णय हा अभय योजनेचा आहे. वाहतुकीचा दंड भरण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.




अभय योजना नेमकी काय आहे?राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाहनांवरील दंडासाठी अभय योजना लागू केली आहे. नियमभंग केलेल्या वाहनावरील दंडासाठी महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलान अभय योजना-२०२६ अशा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून वाहन धारकांना चलनावरील प्रलंबित दंडाच्या रकमेवर एकवेळची बाब म्हणून वीस टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. या योजनेचा फायदा असा की वाहन धारकांना थकबाकी भरून वाहन दंडमुक्त करता येणार आहे.




(सविस्तर बातमी अपडेट होत आहे)

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.