India Iran Relations : इराण आणि अमेरिका युद्धामुळे जगात तेलाचं संकट उभं राहिलं आहे. होर्मुज स्ट्रेट पश्चिम आशियातील युद्धाचा आखाडा झाला आहे. त्यामुळे होर्मुज स्ट्रेटमधून जाण्यास जगभरातील जहाजांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जगभरात इंधनाचं संकट निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर भारतासाठी मात्र एक गोड बातमी येऊन धडकली आहे. इराणने भारतासाठी होर्मुजचे दरवाजे उघडले आहेत. तशी घोषणाच इराणने केली आहे. भारतासाठी ही गुड न्यूज असली तरी अमेरिकेसाठी मात्र हा धक्का मानला जात आहे.
ऐन दिवाळीच्या आदल्या दिवशीच भारताला तेहरानकडून आनंदाची बातमी मिळाली आहे. इराणने भारत, चीन, इराक आणि कतारला या रणनीतीक सागरी मार्गातून जहाजांची ये जा करण्यास परवानगी दिली आहे. जागतिक ऊर्जा संकट आणि सप्लाय चैनमध्ये आलेल्या अडथळ्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय व्यापारी जहाजांना होर्मुजमधून सुरक्षितपणे जाण्यासाठी रस्ता मिळाला आहे.
इराणी संसदेच्या नॅशनल सेक्युरिटी आणि फॉरेन पॉलिसी कमिटीचे व्हाइस चेअरमन अहमद हयात मोगद्दाम यांनी मंगळवारी ही घोषणा केली आहे. भारत सहीत चार देशांचे जहाज या सागरी मार्गातून अडथळ्या विना ये-जा करू शकतात, असं त्यंनी म्हटलं आहे.
भारत
चीन
इराक
कतार
होर्मुज प्रकरणी आम्ही आधीच भारत, चीन, इराक आणि कतारला सुट दिली आहे. ते स्वतंत्र आहेत. म्हणजे आमच्या दृष्टीने ते स्वतंत्र आहेत. अमेरिकेलाही त्यांची काही अडचण नाहीये. ते होर्मुजमधून ये जा करू शकतात, असा दवा हयात मोगद्दाम यांनी केला आहे.
भारताला औषधांची आयात करता यावी या हेतूने ही सूट देण्यात आली आहे. तर चीनला राजनैतिक समर्थन मिळण्यासाठी आणि आर्थिक देवघेव करण्यासाठी सूट देण्यात आली आहे. या देशांचे जहाज सातत्याने ये-जा करत आहेत, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, इराणच्या काही ठिकाणांवर हल्ला केल्याची माहिती अमेरिकेच्या ऐका सैन्य अधिकाऱ्याने दिली आहे. इराणच्या सरकारी मीडियाच्या मते, रणनैतिकतेने होर्मुजमध्ये केश्म आणि हेंगम बेट तसेत जवळचा मुख्य भूभाग बेट अब्बास परिसरात स्फोटाचे आवाज ऐकायला आले आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.