Devendra Fadnavis on Rahul Gandhi : लोकशाही वाचवा, अराजकता हटवा ही घोषणा देत नागपुरात भाजप आणि महायुतीचा महापदयात्रा आज आयोजित करण्यात आली होती. यशवंत स्टेडियम ते पंचशील चौक राणी झाशी चौक व्हेरायटी चौक सविधान चौकापर्यंत ही पदयात्रा गेली. या पदयात्रेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले आहेत. दरम्यान, यावेळी बोलतना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. आज आपण लोकशाही वाचवायला एकत्रित आलो आहोत. राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून लोकशाही आणि संविधानाला टार्गेट केले जात असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय कट केला जात आहे असेही ते म्हणाले.
लोकशाही वाचवा, अराजकता हटवा अशी ही महारॅली आयोजीत केली आहे. आज आपण लोकशाही वाचवायला एकत्रित आलो आहोत. राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून लोकशाही आणि संविधानाला टार्गेट केले जात आहे. राहुल गांधी तुम्ही रस्त्यावर लढण्याचा इशारा दिला होता. लक्षात ठेवा हे डॉ. बाबासाहेबांचा संविधान आहे. आम्ही रस्त्यावरच्या लढाईसाठीही सक्षम आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले. तुम्ही जेवढ्या मोठ्या संख्येत याल, आम्ही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊन दाखवू ही भारताची गर्जना आहे असेही ते म्हणाले.
राहुल गांधींच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय कट केला जात आहे. यांना रेजिम बदलवायची आहे. यांचा रेझीम चेंज फक्त सत्ता बदल नाही तर भारताची लोकशाही यंत्रणा बदलवायची आहे. लोकशाही हटवून अतीडावी व्यवस्था आणायची आहे. या आंतरराष्ट्रीय गटाचे नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे असल्याचे टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. बाबासाहेबांच्या मते जनतेला दिलेले मूलभूत अधिकार संविधानातील सर्वात महत्वाची बाब होती. पण बाबासाहेब तुम्ही अधिकार दिल्यावर एखाद्या सरकारने अधिकार हिरावून घेतले तर काय होणार. 1975 मध्ये इंदिरा सरकारने ते अधिकार हिरावून घेतले होते असेही मुख्यमंत्री म्हणाले.
संविधानाशी खेळ करणारी काँग्रेस आहे, सुप्रीम कोर्टाशी खेळ करणारी ही काँग्रेस आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. राहुल गांधी एका हातात लाल सविधान ठेवतात. बाबासाहेबांचा संविधान निळ होतं. राहुल गांधींनी लाल संविधान कुठून आणले असे मुख्यमंत्री म्हणाले. बाबासाहेबांनी या लाल बावटाबद्दल सावध केले होते. माझ्या संविधानाला धोका लाल बावट्यापासून आहे असे बाबासाहेब त्यांच्या भाषणात म्हणाले होते असे मुख्यमंत्री म्हणाले.
संविधानाला शिव्या दिल्या तर लोक जोडे मारतील हे यांना माहीत आहे, म्हणून संविधानाला काही न बोलता हे संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करत आहेत. संविधानाने निर्माण केलेल्या संस्थाकडून तुम्हाला न्याय मिळत नाही, म्हणून संविधान बदला असेच तुम्हाला राहुल गांधी सांगणार आहेत. बांगलादेश नेपाळ पाकिस्तानमध्ये हेच घडले आहे. मात्र राहुल गांधी यांनी लक्षात ठेवावे संविधानासोबत तुम्ही खेळ करणार तर तुमचेही हात पोळले जाणार. जिवंत लोक आपल्याला मत देतील असा राहुल गांधींना विश्वास नाही, म्हणून मेलेल्या लोकांची नावे पुन्हा मतदार यादीत आणा अशी त्यांची मागणी आहे. बांगलादेशीची नावे बाहेर काढली म्हणून यांच्या पोटात दुखत आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. आज लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही मैदानात उतरले आहोत. मात्र लक्षात ठेवा राहुल गांधी आंतरराष्ट्रीय कटासह देशात रेझीम चेंज करू पाहत आहे. जर आपण जागे झालो नाही तर हे भारताची लोकशाही संपवतील असी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.