Gold Price News : अमेरिकेत अलीकडेच पार पडलेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दारुण पराभव पत्करावा लागला आहे.मध्यावधी निवडणुकांच्या निकालानंतर संसदेमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची विश्वासार्हता लक्षणीयरीत्या कमी झाली असून घेऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत, येत्या काळात ट्रम्प इराणसोबत युद्ध पूर्णपणे संपवण्याच्या दिशेने पाऊल उचलतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे पुढील 100 दिवस केवळ अमेरिकेसाठीच नव्हे, तर भारत आणि उर्वरित जगासाठीही निर्णायक ठरतील. अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर पुढील 100 दिवसांत कच्च्या तेलाच्या किमती 20 डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त घसरू शकतात, असा तज्ञांचा अंदाज आहे. इराणविरुद्ध अमेरिकेच्या युद्धाला विराम लागल्यानंतर कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होईल आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील संकटाचे काळे ढग हटतील. असं झाल्यास महागाई कमी झाल्यामुळे सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या किंमती तेजीची उभारी घेऊ शकतील. अमेरिकी काँग्रेसमध्ये ट्रम्प यांची विश्वासार्हता कमी झाल्याचा परिणाम केवळ आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमतीवरच नव्हे तर, सोने-चांदीच्या किमतींवरही दिसून येतील आणि त्यांचा मागोवा घेत भारतीय बाजारातील दरांमध्येही चढ-उतार दिसून येतील. पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव कमी झाल्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमती वाढतील, असे बहुतेक कमोडिटी तज्ज्ञांचे म्हणणे असून पुढील 100 दिवसांत सोन्याच्या किमतीत 20% वाढू होऊ शकते तर, चांदीचा भाव अंदाजे 45 टक्के वाढू शकतो. अशा परिस्थितीत, पुढील 100 दिवसांत जागतिक बाजारात सोन्याचा दर प्रति औंस 4500 ते 4800 डॉलरपर्यंत पोहोचू शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. म्हणजे सध्याच्या किंमतीवरून सोन्याच्या किंमतीत 500 ते 800 डॉलर प्रति औंसची वाढ होऊ शकते.दुसरीकडे, येत्या 100 दिवसांत चांदीच्या दरात 45% उसळी दिसून येईल आणि 72 ते 75 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारापाठोपाठ भारतीय बाजारातही सोने-चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ होऊ शकते. सोन्याच्या दरात 20% वाढ गृहीत धरल्यास पुढील 100 दिवसांत सोन्याचा दर 1.65 ते 1.70 लाखांपर्यंत पोहचू शकतो. तसेच चांदीच्या किंमती अंदाजे 45% वाढीनुसार पुढील 100 दिवसांत 2.60 ते 2.80 लाखांवर उसळी घेऊ शकतील. त्याचवेळी, 2026 च्या उर्वरित दिवसांत सोन्याची किंमत जास्तीत जास्त 4,600 डॉलर्सपर्यंत मर्यादित राहण्याचा ICICI बँकेच्या विश्लेषकांचा अंदाज आहे तर, त्यानंतर 2027 च्या सुरुवातीत आणखी जोरदार तेजी दिसून येऊ शकते. तसेच जेपी मॉर्गन यांसारख्या वित्तीय संस्थांचे म्हणणे आहे की 2026 वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत चांदीची सरासरी किंमत 63 डॉलर्सच्या आसपास राहू शकते, त्यामुळे पुढील 100 दिवसांत किमतीत कोणतीही तीव्र किंवा अनियंत्रित वाढ होण्याची शक्यता कमी आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.