कोया श्रीजा रेड्डी ही विद्यार्थी अमेरिकेतील बोस्टन शहरातून बेपत्ता झाली आहे. ही विद्यार्थी भारतीय आहे. ती मॅसच्युसेटस बोस्टन विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. कोया श्रीजा ही २ नोव्हेंबराच्या रात्री घरातून निघाल्यानंतर ती घरी परतली नाही. तेथील पोलीसांनी तिचा शोध सुरू केला आहे.




नेमकं काय घडलं?श्रीजा ही तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यातील शब्बुल्लापुरम गावाची रहिवासी आहे. २३ वर्षीय श्रीजा सुमारे वर्षभरापूर्वी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली होती. बॉस्टन मधील यूनीव्हर्सिटी ऑफ मॅसचुसेट्स बॉस्टन येथे ती पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबत ती पार्टटाइम नोकरीही करत होती. श्रीजा ही इतर तेलगु विद्यार्थिनींसोबत डॉचेसटर या परिसरात राहत होती.




२ नोव्हेंबर पासून बेपत्ता२ नोव्हेंबर पासून श्रीजा कॉलेज आणि पार्टटाइम काम संपवून आपल्या अमेरिकेतील घरी परतली होती. त्याच दिवशी तिच्या रूममेटचा वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. तिने पार्टीला येणार असल्याचे सांगितले होते. पार्टीची तयारी सुरू असताना मी थोडं चालून येते असे म्हटले. रात्री ९:४५ च्या दरम्यान ती घराबाहेर पडली. ती एडिसन ग्रिन परिसरातील घरातून बाहेर गेली होती. बराच वेळ उलटला तरीही ती परत आली नाही.




पोलीसांकडून शोध सुरूश्रीजा बेपत्ता झाल्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी पोलीसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर ४ तारखेला बॉस्टन पोलीसांनी मिसिंग पर्सन अलर्ट जारी केला. पोलीसांच्या प्राथमिक माहितीनुसार ती कार्सन बीच, हार्बर पॉइंट या दोन ठिकाणी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे दोन ठिकाण तपासले जात आहे. पोलीसानी श्रीजा बाबतीत काही माहिती मिळाली तर संपर्क साधण्याचे स्थानिकांना आवाहन केले आहे.







वडीलांचा महत्त्वाचा दावाश्रीजाचे वडील यादगिरी रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातून बाहेर पडल्यानंतर तिच्या मोबाइलचे नेटवर्क साधारण अर्ध्या किलोमीटरच्या परिसरापर्यंत उपलब्ध होते. त्यानंतर तिचा फ़ोन बंद झाला.




श्रीजा आई वडीलांना एकुलती एक मुलगीश्रीजा ही आई वडिलांना एकुलती एक मुलगी आहे. तिचे आई वडील शेतकरी आहे. मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती अमेरिकेतील तिच्या मित्रांकडून कुटुंबाला मिळाली आहे. मुलगी सुखरूप परत यावी, अशी विनंती तिच्या कुटुंबियांनी केली आहे. स्थानिक पोलीस मोबईलच्या शेवटच्या लोकेशनच्या आधारे शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्थानिक वृत्तांमध्ये म्हटले आहे. तेलंगणाचे मंत्री कोमतिरेड्डी व्यंकट रेड्डी यांची श्रीजाच्या कुटुंबियांनी भेट घेतली आहे. मदत मागण्यासाठी भेट घेतली.




पोलीसांनी श्रीजाबाबत काय दिली माहिती?श्रीजा ही 23 वर्षांची आहे. साधारण ती 5 फुट 5 इंच उंची आहे. केस तिचे काळे आहे. शरीरयष्टी तिची सडपातळ आहे. तर ती घरातून बाहेर पडली तेव्हा तिने काळे जॅकेट आणि निळी जीन्स घातलेले होते.




Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.