रोहित शर्माच्या (Rohit Sharma Under Captaincy) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये मोठे यश मिळवले आहे. त्याच्या कर्णधारपदाच्या काळात मुंबईने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. या यशाचे मोठे श्रेय रोहित शर्माला दिले जाते. मात्र, 2024 नंतर रोहितकडे संघाचे कर्णधारपद राहिलेले नाही. त्यानंतर मुंबईच्या कामगिरीत घसरण पाहायला मिळाली. हार्दिक पांड्याच्या (Hardik pandya) नेतृत्वाखालीही संघाला अपेक्षित यश मिळाले नाही.


समोर आलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सची साथ सोडून दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये सहभागी होऊ शकतो. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा पुढील कर्णधार कोण असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्याच्या रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्माकडे पुन्हा संघाची धुरा सोपवली जाऊ शकते. त्यामुळे पुढील वर्षी आयपीएलमध्ये रोहित पुन्हा एकदा मुंबईचा कर्णधार म्हणून दिसण्याची शक्यता आहे.


रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या पंजाब किंग्ज (Punjab kings) संघात सहभागी होऊ शकतो. त्याच्या बदल्यात मुंबई इंडियन्स अर्शदीप सिंगला संघात घेऊ शकते. ‘इंडिया टुडे’च्या रिपोर्ट्स नुसार, पुढील आयपीएल हंगामासाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) रोहित शर्माला पुन्हा कर्णधार बनवू शकते. विशेष म्हणजे, फ्रँचायझीकडून 16 ते 18 नोव्हेंबरदरम्यान याबाबत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. ही बाब रोहितच्या चाहत्यांसाठी अतिशय आनंदाची ठरू शकते.


अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनीही रोहितच्या अनुभवाचा विचार करता त्याच्याकडेच मुंबईचे कर्णधारपद असावे, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे फ्रँचायझी त्याच्यावर पुन्हा मोठी जबाबदारी सोपवू शकते. हार्दिक पांड्या 2024 ते 2026 या सलग तीन हंगामांत मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. या काळात संघात अनेक बदल आणि घडामोडी पाहायला मिळाल्या.


दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या संघातही मोठे बदल करण्यात आले आहेत. गेल्या सहा वर्षांपासून संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे फ्रँचायझी नव्याने सुरुवात करण्याच्या तयारीत आहे.


मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने (Mahela Jay wardhane) यांनी 17 ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू कायरन पोलार्डची (Kiron Pollard Head Coach of Mumbai Indians) मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलार्ड अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्सशी जोडलेला आहे.


याशिवाय, भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा (Robbin Utthppa) याची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मिचेल मॅक्लेनघनकडे गोलंदाजी प्रशिक्षकपद, तर धवल कुलकर्णीकडे विकासात्मक गोलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. टी. दिलीप (T. Dilip) यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


कायरन पोलार्डची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतरच रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कर्णधार होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. त्यामुळे आगामी काही आठवडे महत्त्वाचे ठरणार आहेत. रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर विराजमान होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.