राग येणं ही क्रोधाची भावना आहे. पण जसा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात. तसेच परिणाम सतत राग आल्याने शरीरासह मनावरही होतात. यावर काही एक्सरसाईज आहेत ज्या तुम्हाला रागावर कंट्रोल करायला शिकवतात.
जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा डोळे बंद करा. ४ सेकंद दिर्घ श्वास घ्या. त्यानंतर श्वास रोखून ठेवा. नंतर हळूहळू तोंडाद्वारे श्वास बाहेर सोडा. या एक्सरसाइजने नरव्स सिस्टम अॅक्टीव्ह होते. राग शांत होतो.
तसेच ज्यावेळी तुम्हाला राग येतोय किंवा राग येण्याची शक्यता वाढेल तेव्हा आजूबाजूला बघा. मनात अशा ५ गोष्टींचा विचार करा ज्या तुमच्या डोळ्यासमोर आहेत. ज्यातील ४ गोष्टींना तुम्ही सहज स्पष्ट बघू शकाल, त्याचे आवाज ऐकू शकाल, तसेच दोन गोष्टींचा गंध घेऊ शकाल आणि अशी १ गोष्ट ज्याची चव तुमच्या जीभेवर आहे.
रागात नकळत आपल्या मांसपेशी आखडतात. अशावेळी खाली बसावे आणि हातपायाचे स्ट्रेचिंग करावे.
तसेच अचानक राग आल्यास आहात ज्याच जागी उभे राहावे. दोन्ही हात उंच वरती न्यावे. नंतर हळूहळू पायाची बोट खाली वर करावीत. यामुळे रागावरून तुमचे लक्ष जाईल.