ओमान : अंडर १९ आशिया कप २०२६ स्पर्धेतील ८ व्या सामन्यात पाकिस्तानने कट्टर प्रतिस्पर्धी भारतीय संघावर विजय मिळवला आहे. पाकिस्तानने लो स्कोअरिंग सामन्यात भारतावर ३ विकेट्सने मात केली आहे. भारताने पाकिस्तानसमोर अर्जून राजपूत याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर २०९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. पाकिस्तानची या धावांचा पाठलाग करताना बोबडी वळली होती. मात्र विकेटकीपर हामझा झहूर याने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर पाकिस्तानने हा सामना ११ चेंडूंआधी आणि ३ विकेट्स राखून जिंकला. पाकिस्तानने ४८.१ ओव्हरमध्ये ७ विकेट्स गमावून २०९ धावा केल्या. पाकिस्तानचा हा या स्पर्धेतील सलग आणि एकूण दुसरा विजय ठरला. तर भारताचा हा पहिला पराभव ठरला. भारताच्या पराभवामुळे अर्जून राजपूत याचं शतक व्यर्थ ठरलं.




हामझा झहुरने हिसकावला सामनाभारतीय गोलंदाजांनी २०८ धावांचा यशस्वी बचाव करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र हामझामुळे भारताला यश मिळालं नाही. हामझाने १०८ बॉलमध्ये नाबाद १०० धावा केल्या. हामझाने या खेळीत १० चौकार आणि ३ षटकार लगावले. हामझाने सातव्या स्थानी बॅटिंगला येत हे शतक केलं. हामझा मैदानात आला तेव्हा पाकिस्तानची स्थिती ५ आऊट ६१ अशी होती. भारताने त्या टप्प्यावर सामन्यावर घट्ट पकड मिळवली होती. मात्र हामझाने सामन्याचं चित्रच बदललं. हामझाच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं. हामझाच्या या शतकामुळे पाकिस्तानला विजयी होता आलं.




पाकिस्तानचं निराशाजनक सुरुवातीनंतर जोरदार कमबॅकभारतीय गोलंदाजांनी २०९ धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला सुरुवातीला झटपट झटके दिले. जहांगीर बिलाल ५ धावांवर आऊट झाला. तर उस्मान खान याने १६ धावांचं योगदान दिलं. अहमद हुसनैन आणि कर्णधार फरहान यूसुफ या दोघांनाही भारतीय गोलंदाजांसमोर टिकता आलं नाही. अब्दुल कादीर याला सुरुवात मिळाली. मात्र भारतीय गोलंदाजाने कादीरला वेळीच आऊट केलं. त्यामुळे पाकिस्तानची स्थिती ५ आऊट ६१ अशी झाली. त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र इथून सामन्याला कलाटणी मिळाली.




सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारीसातव्या स्थानी मैदानात आलेल्या हामझाने हसनैन याच्यासह शतकी भागीदारी केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाटी १०७ धावा जोडल्या. या भागीदारीमुळे पाकिस्तानच्या विजयाचा पाया रचला गेला. पाकिस्तानने या भागीदारीच्या जोरावर ६१ वरुन १६७ अशी मजल मारली. त्यानंतर हसनैनला आऊट करत भारताने सामन्यात कमबॅक केलं. हसनैन ३८ धावांवर आऊट झाला. भारताने पाकिस्तानला १६८ धावांवर सहावा झटका दिला. त्यानंतर भारताने पाकिस्तानला १८३ धावांवर सातवा झटका दिला. मात्र त्यानंतर हामझाने निकाब शफीक याच्यासह सातव्या विकेटसाठी ३२ बॉलमध्ये नॉट आऊट २६ रन्सची पार्टनरशीप केली. पाकिस्तानने यासह विजय मिळवला.




भारतासाठी मनल चौहान याने सर्वाधिक ३ विकेट्स मिळवल्या. मोहित उलवा याने पाकिस्तानच्या दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. ईशान सूद आणि काव्या पटेल या दोघांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली. मात्र भारतीय गोलंदाजांना पाकिस्तानला विजयापासून रोखण्यात यश मिळालं नाही.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.