मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी, प्रसिद्ध लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये सहभाग आणि नंतर ट्रॅव्हल व्यवसायात मोठं नुकसान या सर्व किस्स्यांमध्ये अडकलेल्या एका कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणानं शॉर्टकट म्हणून गुन्हेगारीचा मार्ग निवडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील कांदिवली पश्चिमेकडील एका ज्वेलर्समधून ५ लाख रुपयांची सोन्याची साखळी चोरणाऱ्या या सुशिक्षित आरोपीला कांदिवली पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. सतीश कुमार कृष्णप्रसाद केसरी (वय ४२, रा. उत्तम नगर, दिल्ली) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून, तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे. सतीश कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक पदवीधर आहे.




नेमका प्रकार काय?मिळालेल्या माहितीनुसार, आला होता. अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्यानं नोकरी करत यूपीएससी परीक्षेची तयारी केली होती, परंतु त्यात त्याला यश आलं नाही. त्यानंतर नशीब आजमावण्यासाठी त्याने टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’मध्येही सहभाग घेतला होता. मात्र, तो केवळ ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ फेरीपर्यंतच पोहोचू शकला, ज्यामुळे त्याचे ‘हॉट सीट’वर बसण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं. स्पर्धा परीक्षा आणि शोमध्ये यश न मिळाल्यानं सतीशनं पत्नीच्या मदतीने ‘टुर्स अँड ट्रॅव्हल्स’चा व्यवसाय सुरू केला. यासाठी त्याने कर्ज काढून ४ ते ५ चारचाकी वाहनं खरेदी केली आणि ती ओला व उबरसारख्या कंपन्यांशी जोडली. परंतु, हा व्यवसाय तोट्यात गेल्यानं त्याच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला.







गुन्हेगारीचा मार्ग पत्करलाकर्जाची परतफेड करणं अशक्य झाल्यानं त्यानं गुन्हेगारीचा मार्ग पत्करला. ग्राहक बनून नामांकित ज्वेलर्सच्या दुकानात जायचं, दागिने पाहण्याच्या बहाण्यानं ते हातात घ्यायचे आणि संधी साधून पसार व्हायचं, असा त्याचा प्लॅन असायचा. त्यानुसार, गेल्या वर्षी १५ नोव्हेंबर रोजी त्याने ला टार्गेट केलं. ग्राहक बनून दुकानात गेलेल्या सतीशने ४३.२ ग्रॅम वजनाची आणि सुमारे ५ लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी पाहण्याच्या बहाण्यानं मागितली आणि संधी साधून पोबारा केला.




बनावट कागदपत्रे सादर केलेपोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने मुंबईतील एका हॉस्टेलमध्ये राहताना बनावट कागदपत्र सादर केले होते. चोरी केल्यानंतर त्यानं आपला मोबाईल फोनही बंद करून ठेवला आणि तो थेट दिल्लीला पसार झाला होता. कांदिवली पोलिसांनी शेकडो सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढला. अखेर तांत्रिक तपासाच्या जोरावर मुंबई पोलिसांच्या पथकाने दिल्लीत छापा टाकून सतीशला अटक केली आणि त्याच्याकडून चोरीची सोन्याची साखळी जप्त केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने दिंडोशी परिसरातही अशाच प्रकारे चोरी केल्याची कबुली दिली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून कांदिवली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.




Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.