हाँगकाँग अँड शांगाई बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेड या ब्रिटन स्थित वित्तीय संस्थेने भारतीय शेअर बाजारासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे या संस्थेने चीनच्या शेअर बाजारासाठी नकारात्मक कल दिला आहे. गेल्या वर्षापासून भारतीय शेअर बाजार सलग घसरत्या दिशेने होता. या बाजारातून मिळणारा परतावाही नकारात्मक होता. याच वर्षात परदेशी गुंतवणूकदारांनी लाखो-कोटी रकमेच्या गुंतवणुका इतर देशांतील गुंतवणूक पर्यायाकडे वळवली. अशात HSBC ने दिलेला अंदाज जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षक करत आहे. त्यात चीनच्या शेअर बाजाराला नकारात्मक म्हणून भारतीय शेअर बाजाराचा कल सकारात्मक राहील असा अंदाज दिल्याने भारतीय गुंतवणूकदार मंडळींमध्ये चर्चेला विशेष फाटा फुटला आहे.




HSBC ने भारतीय शेअर बाजाराचे रेटिंग Overweight केलेआधी याच HSBC संस्थेने भारतीय शेअर बाजाराला Neutral रेटिंग दिली होती. पण त्यात आता सुधार करण्यात आला आहे. आता HSBC ने भारतीय शेअर बाजाराला Overweight केले आहे. एकंदरीत जगभरातील गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीत भारतीय शेअर बाजारातील वाटा वाढवावा असा या संस्थेचा सल्ला आहे. याच दरम्यान त्यांनी आधी Overweight असलेल्या चीनच्या शेअर बाजाराची रेटिंग Neutral वर बदलली असल्याने चीनबद्दल गुंतवणूकदारांमध्ये अनेक प्रश्न आहेत.




भारतीय शेअर बाजारात असे खास नेमके काय घडत आहे? औद्योगिक तसेच हॉस्पिटल क्षेत्र आणि कंज्यूमर डिस्क्रेशनरी या क्षेत्रांवर HSBC ने विशेष विश्वास दाखवला आहे. तर देशातील इतर क्षेत्र जसे की IT, FMGC, तेल आणि गॅस, युटिलिटीज आणि औषध निर्मिती या क्षेत्रांबद्दल सावध राहण्याचा इशारा दिला आहे. परंतु या वित्तीय संस्थेचा भारतीय शेअर बाजारासाठी असलेला एकूण प्रतिसाद सकारात्मक आहे. यामागे भारतीय कंपन्यांच्या नफ्यात होणारी वाढ, देशांतर्गत मागणी मजबूत असणे, बँकांकडून कर्जाचे वाटप वाढणे, सरकारकडून पायाभूत सुविधांसाठी होणारा खर्च तसेच शेअर बाजार घसरल्यानंतर शेअर्स तुलनेने आकर्षक किमतीत उपलब्ध झाले असल्याची कारणे सध्या चर्चेत आहेत. परंतु कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, एल निनोचा प्रभाव, महागाई वाढणे तसेच रुपयावरील दबाव वाढणे भारतीय शेअर बाजारासाठी संभाव्य धोका आहे.




HSBC चा कल चीनच्या शेअर बाजारासाठी नकारात्मक का? तेजी येईल यासाठी कोणताही ठोस कारण सध्या संस्थेला दिसत नाहीये. अशा चीनच्या स्वतःच्या ग्राहकांमध्ये त्यांच्याबद्दल खूप गोंधळ आहे. चीनच्या देशांतर्गत गुंतवणुकीतही नरमाई दिसून येत आहे तसेच रियल इस्टेट क्षेत्रातील अडचणी कायम आहेत. त्यामुळे HSBC ने त्यांचा कल Overweight वरून Neutral आणला असावा असा अंदाज आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.