मुंबई : बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली असून डिसेंबर महिन्यात या मालिकेला सुरूवात होणार आहे. एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची हा मालिका होणार आहे. महाराष्ट्राच्या सांगलीची असणाऱ्या स्मृती मानधना हिच्याकडे पूर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्मृती आता कसोटी, वनडे आणि टी-२० या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयच्या महिला निवड समितीने तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या भारतीय संघांची घोषणा केली आहे. माजी कर्णधार हरमनप्रीत कौर केवळ एक खेळाडू म्हणून या दौऱ्यात खेळताना दिसेल, तर जेमिमाह रॉड्रिग्जचेही संघात कमबॅक झाले आहे.




कसोटी आणि वन-डे संघाचा विचार केला तर, कर्णधार स्मृती मंधानासोबत शेफली वर्मा, प्रतीका रावल, हरमनप्रीत कौर, जेमिमाह रॉड्रिग्ज आणि हरलीन देओल या प्रमुख फलंदाजांना स्थान मिळाले आहे. या दोन्ही फॉरमॅटमध्ये विकेटकीपर म्हणून जबाबदारी ऋचा घोष आणि यास्तिका भाटिया सांभाळणार आहेत. तर अष्टपैलू दीप्ती शर्मा हिच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. याशिवाय स्नेह राणा, श्री चरणी, क्रांती गौड, नंदनी शर्मा, जिंतिमणि कलिता आणि सायली सातघरे यांचाही कसोटी व वन-डे संघात समावेश करण्यात आला आहे.




दुसरीकडे, टी-२० संघाची कमान स्मृती मंधानाकडेच असेल, मात्र उपकर्णधार म्हणून धडाकेबाज फलंदाज शेफाली वर्मा हिची निवड झाली आहे. या संघात जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर, ऋचा घोष आणि दीप्ती शर्मा या वरिष्ठ खेळाडूंसोबतच निकी प्रसाद, जी. कमलिनी आणि अनुष्का शर्मा सारख्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून अमनजोत कौर देखील टी-२० संघात आपली जागा मिळवण्यात यशस्वी ठरली आहे.




भारताचा कसोटी संघ: स्मृती मानधना (C), शेफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, ऋचा घोष (WK), यास्तिका भाटिया (WK), दीप्ती शर्मा [व्हीसी], श्री चरणी, स्नेह राणा, क्रांती शर्मा, क्रांती गौड, नंदनी शर्मा, जिंतीमणी कलिता, सायली सातघरे




भारताचा वनडे संघ: स्मृती मानधना (C), शेफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरलीन देओल, ऋचा घोष (WK), यास्तिका भाटिया (WK), दीप्ती शर्मा (VC), श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, नंदनी शर्मा, जिंतीमणी कलिता, सायली सातघरे




भारताचा T20I संघ: स्मृती मानधना (C), शफाली वर्मा (VC), जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर, निकी प्रसाद, ऋचा घोष [WK], G. कमलिनी (WK), अनुष्का शर्मा, दीप्ती शर्मा, श्रीचरणी, प्रेमा रावत, अमनजोत कौर, क्रांती गौड, नंदनी शर्मा, रेणुका सिंह ठाकूर, अरुंधती रेड्डी, सायली सातघरे




भारतीय महिला संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक

  • पहिली कसोटी : ९ डिसेंबर, गेकेर्हा



  • पहिला वनडे सामना : १६ डिसेंबर, पार्ल

  • दुसरा वनडे सामना : १९ डिसेंबर, केप टाऊन

  • तिसरा वनडे सामना : २२ डिसेंबर, ब्लूमफॉन्टेन



  • पहिला टी-२० सामना- २६ डिसेंबर, बेनोनी

  • दुसरा टी-२० सामना- २९ डिसेंबर, पॉचेफस्ट्रूम

  • तिसरा टी-२० सामना- ३० डिसेंबर, पॉचेफस्ट्रूम

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.