ओमान : अंडर १९ आशिया कप २०२६ स्पर्धेतील ११ व्या सामन्याचा निकाल लागला आहे. भारतीय संघाने यूएईवर ७० धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने आर्यवीर सेहवाग याच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर यूएईसमोर ३१० धावांचं आव्हान ठेवलं होतं. यूएईने या धावांचा पाठलाग करताना संपूर्ण ५० ओव्हर खेळून काढले. मात्र यूएईला २५० हा आकडाही गाठता आलं नाही. भारताने यूएईला त्यांच्या डावातील शेवटच्या चेंडूवर ऑलआऊट केलं. यूएईने २३९ धावा केल्या. भारताने अशाप्रकारे सामना आपल्या नावावर केला. पाकिस्तान विरुद्धच्या पराभवामुळे भारतासाठी सेमी फायनलच्या दृष्टीने यूएई विरुद्धचा सामना करो या मरो असा होता. मात्र भारताने हा सामना यशस्वीपणे आपल्या नावावर केला. भारताने या विजयासह उपांत्य फेरीत धडक दिली. लक्ष्यदीप रायचंदानी याच्या नेतृत्वात भारताने ही कामगिरी केली. तसंच आर्यवीर सेहवाग भारताच्या विजयाचा हिरो ठरला.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.