प्रसाद रानडे,रत्नागिरी: कोकणातील लांजा तालुक्यातून पंढरपूरला कार्तिकी एकादशीच्या पंढरीच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड ते कोल्हापूर गावडी येथील माऊली घाटातून वारकऱ्यांसाठी रस्त्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.




गेली तब्बल 31 वर्षांची मागणी असलेल्या या मार्गाला शिवसेनेचे नेते व कोकणातील राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार किरणभैया सामंत यांनी पायी दिंडीच्या मार्गाला पंढरीची वाट दाखवल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या वर्षी पायी दिंडी कार्यक्रमाला आलेल्या आमदारांनी पुढील वर्षी या खडतर रस्त्यावरून नाही तर राजमार्गावरून दिंडी जाईल असा शब्द दिला होता तो शब्द किरण भैय्या सामंत त्यांनी यावर्षी खरा ठरवत पुरा केल्याची प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी व वारकऱ्यांनी दिली आहे. आता लवकरच या मार्गाला जिल्हाप्रमुख मार्गाचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे.




गावडी घाटातून रस्त्याचा मार्ग मोकळा झालापायी प्रवास करणाऱ्या या दिंडीच्या मार्गावरती आजवर वारकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना सहन करावा लागत होता. रस्ता उपलब्ध नसल्याने अनेक गैरसोयींना सामोरे जाण्याची वेळ पायी दिंडी करणाऱ्या वारकऱ्यांवर दरवर्षी येत होती. अखेर वारकऱ्यांची ही दरवर्षीची जुनी मागणी लक्षात घेऊन सामंत यांनी या मार्ग परिसराची पाहणी करत प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. त्यामुळे आता लांजा भांबेड येथून घाट परिसरात जाण्यासाठी गावडी घाटातून रस्त्याचा मार्ग मोकळा झाला असून तब्बल 31 वर्षांच्या या पायवाटेला अखेर हक्काचा रस्ता मिळाला आहे.




वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भावयाच पार्श्वभूमीवर दरवर्षी निघणारी पंढरीची वारी लांजा तालुक्यातील भांबेड येथून मोठ्या भक्तीभावाने विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. विशेष म्हणजे या दिंडी सोहळ्याला आमदार किरणभैय्या सामंत यांनी उपस्थित राहुन या दिंडी सोहळ्याचा आनंद घेतला. गेल्या तब्बल 31 वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव पाहायला मिळाले. यावेळी गेल्या कित्येक वर्षांच्या मागणीला सामंत आमदार झाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात यश आल्याने वारकऱ्यांकडून त्यांचा कौतुकाने सन्मान करण्यात आला. नूतन आमदारांनी या विषयात लक्ष घातल्याने स्थानिक ग्रामस्थांची व वारकऱ्यांची असलेली प्रतीक्षा आता मार्गी लागली आहे.




त्यामुळे आता लांजा तालुक्यातील भांबेड येथून पश्चिम महाराष्ट्र जोडणारा नवा घाटमार्ग रस्ता भविष्यात पक्का होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नवीन घाट रस्त्यामुळे या सगळ्या परिसरात पर्यटन उद्योग आणि शेती व्यवसायालाही नव्याने चालना मिळणार आहे.







डीपीआर बनवण्याचे काम सध्या सुरूरत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड धनगरवाडी ते गावडी अशी एकूण एकूण 10 किलोमीटर घाट मार्गाची लांबी आहे. या मार्गाचा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मार्गासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. यातील सहा किलोमीटर घाटमार्ग नव्याने दुरुस्त करावा लागणार आहे. या सगळ्या माऊली घाटमार्गाचा सर्वे करून डीपीआर बनवण्याचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान याच मार्गावर कोल्हापूर जिल्ह्यातील शेंबवणे ते शाहुवाडी हा मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी या आधीच खुला झाला आहे.




नवा पर्यायी रस्ता ठरणार आहेत्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील याच मार्गावरील रस्ता वाहतुकीसाठी खुला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील या माऊली घटमार्गातील दहा किलोमीटरचा प्रमुख जिल्हा मार्ग मंजूर झाल्यास हा नवा पर्यायी रस्ता ठरणार आहे. कोल्हापूर ते लांजा हे तब्बल 25 ते 30 किलोमीटरने अंतर कमी होणार आहे. हा प्रमुख जिल्हा वर्ग होण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांची ज्येष्ठ बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांनी लक्ष घातले असून लवकरच हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे. अणुस्कुरा घाट मार्गला हा मार्ग पर्यायी व जवळचा ठेवणार आहे.




Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.