नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी आणि बॉलिवूडचे 'महानायक' अमिताभ बच्चन यांच्यातील मैत्री भारतीय राजकारण तसंच सिनेइंडस्ट्रीत नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे.या दोन्ही दिग्गज घराण्यांमधील नातेसंबंध तीन पिढ्यांहून अधिक जुने आहेत. याच मैत्रीचा एक अत्यंत दिलखुलास आणि मजेदार किस्सा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आपल्या 'बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' या नवीन पुस्तकात शेअर केलाय.




राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन हे दोघेही तरुण असतानाचा आणि आपापल्या क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वीचा हा किस्सा आहे. त्या काळात राजीव गांधी यांनी अद्याप राजकारणात पाऊल ठेवलं नव्हतं आणि अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी मुंबईत संघर्ष (स्ट्रगल) करत होते.



विमानतळावरील तो प्रँक




एकदा मुंबईहून दिल्लीला परतत असताना राजीव गांधी त्यांना भेटण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. आपल्या मित्राची खोड काढण्याच्या आणि त्याला चिडवण्याच्या उद्देशानं राजीव गांधींनी विमानतळावरच एक अनोखा प्रँक रचला. राजीव यांनी अमिताभ यांच्या स्वागतासाठी खास एक ब्रास बँड आणला होता, पण तो बँड अत्यंत बेसुरा वाजणारा होता!







अमिताभ बच्चन विमानतळाबाहेर येताच त्या बेसुऱ्या ब्रास बँडनं वाजवण्यास सुरुवात केली, ज्यामुळं तिथं उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि एकच हशा पिकला. राजीव गांधींचा हा खोडकर अंदाज पाहून अमिताभ बच्चनही चकित झाले होते.



सोनिया गांधींच्या पुस्तकातून समोर आला मैत्रीचा सुवर्णकाळ




सोनिया गांधींच्या '' या पुस्तकातून गांधी आणि बच्चन कुटुंबातील सुरुवातीच्या काळातील निखळ मैत्रीचा काळ समोर येतो. राजीव गांधी यांचा हा खोडकर आणि मिश्किल स्वभाव सर्वसामान्यांना फारसा माहिती नव्हता,पण या पुस्तकातील प्रसंगांमुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक रंजक पैलू उलगडले आहेत.







जरी नंतरच्या काळात राजकीय आणि वैयक्तिक कारणांमुळें या दोन कुटुंबांमध्ये काही प्रमाणात अंतर आलं असले, तरी सोनिया गांधी यांच्या या आठवणींमुळं राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन यांच्यातील तरुणपणातील निष्पाप आणि घट्ट मैत्रीला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.